युवक बिरादरी या संस्थेमार्फत कार्यशाळेचे आयोजन.

विवेकानंद प्रशासकीय महाविद्यालय हिंगणघाट येथील विद्यार्थी सहभागी.

प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- युवक बिरादरी या संस्थेमार्फत अभिरूप युवा संसद व युवा भूषण या स्पर्धेसाठी नागपूर येथील प्रशासकीय महाविद्यालय येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती या कार्यशाळेत विवेकानंद प्रशासकीय महाविद्यालय हिंगणघाट, जिल्हा वर्धा येथील विद्यार्थी सहभागी झाले.असून सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संसदेचे कामकाज कार्यप्रणाली व इतरही बाबीचे प्रत्यक्ष धडे गिरवले.

या कार्यशाळेतनंतर विद्यार्थी पुढील विभागीय स्पर्धेसाठी तयार होणार आहे .सदर कार्यशाळेत युवक बिरादरी संस्थेतर्फे आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी नाट्य,अभिनय ,दिग्दर्शन, या सोबत संसदेच्या दोन्ही अंगाचे प्रात्यक्षिक ज्ञान घेतले. सोबत जीवनाचे महत्त्व आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदारी व प्रशासनातील अधिकाऱ्याचे महत्त् या बदल सविस्तर मार्गदर्शन केलें,या स्पर्धेसाठी विवेकानंद प्रशासकीय महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष. प्रा. योगेश प्रकाश वानखेडे प्रा.आकाश झाडे विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी अनिशा येडे ,अनिकेत उमक ,शीतल वानखेडे उपस्थित होते.विभागीय स्पर्धा ४ जानेवारी २०२१ ला नागपूर येथील धनवटे कॉलेज ला होणार असून विभागीय स्पर्धेसाठी महाविद्यालयातील 21विद्यार्थी पात्र ठरले आहे विभागीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेछ्या व अभिनंदन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here