नागपूर कार आणि ट्रेलरच्या अपघातात चार जण ठार.

52

नागपूर कार आणि ट्रेलरच्या अपघातात चार जण ठार.

नागपुर मिहान भागात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एका कारला ट्रेलरने उडवले. या अपघातात एकाच कंपनीतील चौघे जण ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला. जखमीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर :– नागपुरात वाळूची अवैध वाहतूक करणा-या भरधाव ट्रकने कारला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय. वर्धा मार्गावरील खापरी नजीकच्या उड्डानपुलाजवळ शुक्रवारी पहाटे हा अपघात घडला. अपघातातील जखमीला शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलेय.

यासंदर्भात स्थानिक सोनेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्धा मार्गावरील बुटीबोरी औद्योगिक परिसरातील (एमआयडीसी) माहितीतंत्रज्ञान (आयटी) कंपनीतील रात्रपाळी कर्मचा-यांना घरी सोडण्यासाठी जाणा-या कारला खापरी परिसरातील मिहान उड्डाणपुलानजीक वाळूची अवैध वाहतूक करणा-या एका भरधाव ट्रकने भीषण धडक दिली. वाळूची वाहतूक करणा-या या ट्रकने कारला समोरच्या बाजूने जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हे चौघेही 25 ते 35 वयोगटातील होते. मृतांमध्ये बालचंद्र उके, पियूष टेकाडे, नेहा गजभिये, पायल कोचे यांचा समावेश असून आशिष सरनालयन हे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान आशिष यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (मेडिकल) दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनेगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, तपास सुरू आहे.