वंचित बहुजन आघाडी तालुका आंमगाव च्या वतीने 10 मे अॅड बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस “स्वाभिमान” दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला
विश्वजीत गणवीर
अमगांव तालुका प्रतिनिधि
मो:9975794691
वंचित बहुजन आघाडी आंमगाव च्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवसा निमित्ताने स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
बाबासाहेबांन पीकविलेला मळा आणि त्या मळ्याच राखंदार आहेत बाळासाहेब,
हात धरून डाग दाखवायची हिंमत नाही बघा कुणात, एवढं निर्मळ आहेत बाळासाहेब.
चिकित्सा, तत्वनिष्ठा, वंश वारसा ह्या समद्या दुधारी तलवारींना झेलत इथल्या आलुतेदार, बलुतेदार, अठरापगड जाती आणि लिंग भेदाच्या भीती मध्ये कोंबलेल्या पिढ्यांना मोकळ करण्याची धडपड आहेत बाळासाहेब..
प्रश्न ओबीसीच्या आरक्षणाचा असो नाहीतर मुसलमानांचा अधिकारांचा, बायांवर होणारे अन्याय अत्याचार असो किंवा भ्रष्ट नेत्यांना घालायचा कासरा असो बाळासाहेब म्होर असतात सरकारची गचांडी धरायला.
सत्तेत वाटेकरी होण्यासाठी प्रस्थापितांशी थोड गोड झाल पाहिजे
बाळासाहेब नावाचं वादळ न वाकत ना वाकु देत कुणाला
बाळासाहेबासंग धडका घ्यायला इमानदारीच दूध पेऊन यावं लागतो
लाचारीत पिढया गेलेल्यांना लीडर बनवण्याचा कारखाना आहेत बाळासाहेब.
माझा नेता लाचारीने कुणापुढे वाकत नाही म्हणून आम्ही साहेबांचा वाढदिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करतो..
आमच्या स्वाभिमानानं आम्हाला हे शिकवलय हरलो तरी चालेल पण लढताना स्वाभिमान कोणाच्या पायावर ठेवायचा नाही.
आमच्या स्वाभिमानाचे रक्षक म्हणून आमची ढाल होवून उभे राहणारे बाळासाहेब तुम्ही शतायुषी व्हा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप मंगल कामना…..
असे जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी आपल्या मार्गदर्शनात बोलले. कार्यक्रमाला उपस्थित मा. प्यारेलाल जांभूळकर जिल्हा उपाध्यक्ष ,मा. मंगल गोंडाणे तालुका अध्यक्ष, मा. चंद्रकुमार मेश्राम महासचिव, एम. बी. विश्वजित सचिव, भजनदास बोरकर,सुरेश बोरकर,चंद्रकांत मेश्राम, देवेंद्र चंद्रकापुरे सुरेश बोरकर व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते.