संतोषसिंह रावत यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा – आ. किशोर जोरगेवार

54

संतोषसिंह रावत यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करा – आ. किशोर जोरगेवार

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर : काही अज्ञातांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्यावर गोळीबार केला या हल्यात ते जखमी झाले. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी मुल येथील निवासस्थानी जाऊन संतोषसिंह रावत यांची भेट घेत त्यांच्या प्रकृती बाबत माहिती घेतली. यावेळी आ. जोरगेवार यांनी दुरध्वनी वरुन जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्याशी संपर्क साधत घटनेचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिले. तसेच आरोपींचा शोध घेत त्यांना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या. 

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे मुल येथील शाखेतील बैठक आटोपून बाहेर निघताच चारचाकीने आलेल्या काही युवकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात संतोषसिंह रावत यांच्या हाताला व खांद्याला जखम झाली. या घटनेनंतर मुल तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान आ. जोरगेवार यांनी त्यांची भेट घेत घटनेबाबत माहिती घेतली आहे. यावेळी आ. जोरगेवार यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्याकडून या प्रकरणाची माहिती घेत आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या. घडलेला हा प्रकार चिंताजनक आहे. एखाद्या प्रतिष्ठित नागरिकावर गोळीबार झाल्याचा प्रकार यापूर्वी जिल्ह्यात कधीही घडला नाही. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य अधिक आहे.

•पोलीस अधीक्षकांना सूचना, मूल येथील निवासस्थानी आ. जोरगेवार यांनी घेतली संतोषसिंह रावत यांची भेट

 •संतोषसिंह रावत यांचा पिस्तुल परवाना तात्काळ नुतनिकरण करत सुरक्षा द्या

चंद्रपूर जिल्हा शांतीप्रिय जिल्हा आहे. येथे अशा प्रकारे बंदुकधारी युवक फिरत असेल तर ही चिंतेची बाब आहे. असे जिवघेणे हत्यार यांच्याकडे येतात कुठुन याचीही आता सखोल चौकशी पोलिस विभागाने करावी. अशा सुचना यावेळी आ. जोरगेवार यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या. संतोषसिंह रावत यांच्याकडे स्वरक्षणासाठी स्वत:ची पिस्तुल होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी परवान्याचे नूतनीकरण केले नाही. त्यांच्या पिस्तुल परवान्याचे तात्काळ नविनिकरण करा. अश्या सूचनाही जिल्हाधिकारी विनय गौडा यांना आ. जोरगेवार यांनी दिल्या

 तसेच संतोषसिंह रावत यांना पोलीस सुरक्षा देण्याच्या सूचनाही आ. जोरगेवार यांनी पोलीस अधीक्षक परदेसी यांना केल्या.