मनसेच्या तालुका व शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिला अखेरचा राजीनामा
अमित सुरेश वैद्य
सालेकसा तालुका प्रतिनिधी
मो: 7499237296
गोंदिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे व युवांमध्ये सगळ्यात जुने शहरातील शहर संघटक व *विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष* *क्षितिज वैद्य,* निखिल ढोंगे, खेमराज ठाकरे,(परसवाडा) विपीन पारधी, (धापेवाडा) वैभव खोब्रागडे, (दवनीवाडा) राणा नागपुरे, (फुलचुर) राहुल यावलकर,तसेच शहारातील शहर शहर उपाध्यक्ष *रजत बागडे,* शहर उपाध्यक्ष सुमित कावळे, शहर उपाध्यक्ष अनिकेत सांडेकर, शहर सहसचिव अजय कलाणे, शहर प्रसिद्धी प्रमुख *कृष्णा ढोंगे,* विद्यार्थी सेना मधील शहर उपाध्यक्ष निखिल गडपायले, रितीक नागपुरे, राहुल बाकरे, तसेच देवरी तालुका येथील तालुका अध्यक्ष शैलेश राजनकर यांच्या सह अनेक निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र करुन मनसे गोंदिया जिल्हा अध्यक्ष मनीष चौरागडे यांना आपल्या पदाचा राजीनामा सौपविला
या विषयावर बोलताना सुरेश ठाकरे यांनी सांगितले कि, जिल्ह्यातील मोठे पदाधिकारी तालुका लेवल च्या अध्यक्षा पासून तर शाखा अध्यक्ष पर्यंतचा पदाधिकारी यांना विश्वासात न घेता आपल्या ऐकरी निर्णय थोपविण्याचा काम करीत असतात पक्ष वाढविण्या विषयी कोणत्याही प्रकारची इच्छा दाखवित नाही. कार्यकर्त्यांची बैठक सुध्दा घेत नाही. पक्षाविषयी चर्चा करण्यात येत नाही. जिल्हास्तरीय अनेक प्रश्न घेऊन त्याला न्याय देण्याचे काम होत नाही सामन्य कार्यकर्यांशी व्यवस्थित सुसंवाद केला जात नाही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपले पद घेऊन आपआपल्या परिने फक्त आपल्या स्वार्थापोटी दुसऱ्याच्या मांडीला मांडी लावुन काम करण्यात मग्न असल्याचे निदर्शनास येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला या लोकांनी हतबल करण्याचे काम केले आहे.
आम्ही १७ वर्षांपासून आपला अमूल्य वेळ दिल्यावर हि वरिष्ठांना त्यावेळेचा काही मोल वाटत नाही सामन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जिल्हा पातळीच्या पदाधिकाऱ्यांपासुन गळचेपी होत असेल तर हा पक्षाचा कणा कुठपर्यंत सहन करणार आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी एकनिष्ठेने पक्ष वाढविण्याचा काम व जनसामान्यांचे काम करित आलो परंतु गोंदिया जिल्ह्यातील वरिष्ठ पक्षश्रेष्ठी मुळे पक्षाला गती मिळण्या जागी त्यांनी पक्षाला कुलुप च गोंदिया तालुक्यात लावुन टाकला अनेक वेळा आम्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना वारंवार इथल्या परिस्थिती बाबत माहिती दिल्यावर सुध्दा या गोंदिया जिल्ह्याकडे लक्ष देण्यास किंव्हा वेळ देण्यास कोणी तयार नाही म्हणून आता आम्ही सुद्धा निर्णय घेतला कि, आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची गरजच नाही तर मग उगाच कशाला आपला वेळ वाया घालावा करिता आज दिनांक १४ मे २०२३ रोजी आम्ही सर्व गोंदिया तालुका व शहरातील पदाधिकारी एकमताने आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांचा कडे सौपविण्यात आले.
यामध्ये तालुक्यातील रवि डोंगरे, नागोराव डोंगरे, अमर बिलोणे, समिर डोंगरे रोहित बिलाणे , रोहित मांडले, अमन शहारे, स्नेक नंदेश्वर, अभिषेक बिसोडे, संजय बनोटे, समिर माहुलै, रवि पिसोडे नितिन बोटे, आदर्श धमगाये यांचा समावेश होता..