मुंबई गोवा महामार्गवरील माणगांव येथील मुगवली गावाजवळ ट्रक वर एस टी चा भीषण अपघात

56

मुंबई गोवा महामार्गवरील माणगांव येथील मुगवली गावाजवळ ट्रक वर एस टी चा भीषण अपघात

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो:8080092301

माणगांव :-मुंबई गोवा महामार्गावर दिनांक १४ मे रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ट्रक क्रमांक एम एच ०८ ए पी ७०९३ हा आपल्या ताब्यातील ट्रक हा माणगांव बाजूकडून महाड बाजूकडे भरधावं वेगाने हायगायीने बेकायदेशीर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून उजव्या बाजूने रॉंग साईडला वेडावाकडा चालवीत येऊन एस टी क्रमांक एम एच २० बी एल ३०११ हिला डाव्या बाजूने ठोकर मारून अपघात केला व ट्रक चालक त्या ठिकाणहून पळून गेला.

सदर मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की महाड बाजूकडून माणगांव बाजूकडे येणारी रोहा कोल्हापूर एसटी ही मौजे मुगवली गावच्या हद्दीत आली असता हा अपघात घडला या अपघातात प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना गंभीर स्वरूपात दुखापत झाली असून जखमी रमेश गणपत घोणे वय वर्ष ७० रा. कोलाड, ज्ञानेश्वर नथुराम राऊत वय वर्ष ४२ रा. कलमजे माणगांव, छाया पांडुरंग पेढनेकर वय ४० रा. मांदाड, यशोदा तुकाराम भोसले वय ६५ रा. सातारा, रंजीत मधू वाढवलं वय ३५ रा. कलमजे माणगांव, सुशील बाबुराव माने वय ३७ रा सातारा, रंजना तुकाराम भोसले वय २३ रा. सांतारा, आणि काशीबाई लक्ष्मण साळुंखे वय ७५ रा. सातारा हे गंभीर स्वरूपात जखमी झाले असून त्यांना माणगांव येथील उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे उपचारासाठी हळविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती माणगांव पोलीस स्टेशनं येथे कळताच माणगांव पोलीस ठाण्याचे माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पो. ह. कोळेकर पोलीस सब इन्स्पेक्टर गायकवाड घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात ट्रक इसमाविरुद्ध कॉ. गु. रजि. नं १४७/२०२३ नुसार भा द वि सं कलम ३३७,३३८ मो वा का क १८४,१३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास करीत आहेत.