स्कूल टू कन्व्हर्ट ॲन इंडिव्हिज्वल इन टू द सोशियल जनरेटर म्हणजे नंदू वानखडे यांची कविता: श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे प्रतिपादन

77

स्कूल टू कन्व्हर्ट ॲन इंडिव्हिज्वल इन टू द सोशियल जनरेटर म्हणजे नंदू वानखडे यांची कविता: श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे प्रतिपादन

गोंदिया शहर प्रतिनिधी

राजेन्द्र मेश्राम 

मो: 9420513193

गोंदिया: बुद्धिस्ट समाज संघ संथागार येथे पुस्तकाचे विमोचन समारंभ थाटात संपन्न सर्व प्रथम मान्यवरांकडून तथागत बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर दिप प्रज्वलित करून प्रारंभ करण्यात आला.

“अजूनही त्या पिलांना चारा कुठे मिळाला?

बांधून ठेवलेला भारा कुठे मिळाला?

लुकलुकती भोवताली काजवेच राहू राहू

डोळ्यात अंधाराच्या तारा कुठे मिळाला?

आदळती वादळे ही अजूनही किनाऱ्यावरती

सागरास या सुखाचा वारा कुठे मिळाला?

अजूनही त्या तुफानांशी झुंजच सुरू त्यांची 

नौकेस शोषितांच्या किनारा कुठे मिळाला?”…

भारतीय राज्यघटना जे जीवन देऊ इच्छिते ते जीवनच’ न ‘दिल्या गेल्याची कविता म्हणजे नंदू वानखडे ची कविता. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरची सुद्धा हीच परिस्थिती असेल तर या समतेची कविता नंदू वानखडे यांना आजही लिहावी लागते. राज्यघटनेने दिलेले संपूर्ण स्वातंत्र्य बहुजनांना अजूनही पूर्णपणे दिल्या गेलं नाही, यासाठी नंदू वानखडे यांना कविता लिहावी लागते गोठून बर्फ झालेल्या समाजाला चेतवण्यासाठी, पेटवण्यासाठी नंदू वानखडे ची कविता काम करते. पण त्यात कुठलाच आक्रस्ताळेळेपणा दिसून येत नाही. बहुजनांनी बहुजनांचेच केलेले शोषण यावर नंदू वानखडे यांची कविता काम करते. ज्यांच्या मेंदूला जे ‘जुने’ चिकटलेले आहे अजूनही ते निघत नसेल तर ते खरवडून टाकण्याचं काम, नंदू वानखडे यांची कविता करते. सौंदर्यशास्त्राचे बदलते स्वरूप म्हणजे ही कविता आहे. समतेचा रखडलेला संवाद सुरू करण्याचं काम नंदू वानखडे यांची कविता करते. नंदू वानखडे कविता का करतात या मागचं त्यांचं कारण आहे की, नंदू वानखडे म्हणजे स्कूल टू कन्व्हर्ट ॲन इंडिव्हिज्वल इन टू द सोशल जनरेटर..! हे त्यांच्या कवितेचे प्रयोजन आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी महामंडळाचे पूर्वअध्यक्ष ज्येष्ठ संवाद तज्ञ, समीक्षक यांनी प्रा. नंदू वानखडे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी केले.

गोंदिया येथील संथागार विहारात दिनांक १४ मे २०२३,रविवार रोजी आयोजित सदर प्रकाशन सोहळ्यात ‘ज्याला नाही माय’ कथासंग्रह आणि ‘अंतर्मनातील आंदोलने ‘या दोन पुस्तकाचं प्रकाशन श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अतिशय साध्या सरळ भाषेत या कवीची कविता हृदयाला हात घालते. असे ते म्हणाले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध ज्येष्ठ समीक्षक प्रा.युवराज गंगाराम हे होते. ते म्हणाले की, नंदू वानखेडे हा कवी जीवनाशी चर्चा करणारा कवी आहे. तो जीवनाशी चौफेर चौकशी करतो. कविता, कथा आणि चित्र या ऊर्जा देणाऱ्या झाडाला लागलेल्या तीन फांद्या आहेत त्या झाडाचे नाव मी, नंदू वानखडे ठेवलेले आहे. धगधगत्या कविता करणे त्यांना आवडते. या प्रतिभेच्या गृहपाठाकडे माझे बारीक लक्ष आहे. नंदू वानखडे एक कवी चित्रकार आहेत. कवितेच्या निखळ आशयापाशी जाणारा कवी म्हणून त्याची उद्या नोंद होईल असे ठाम वाटते. एकंदरीत नंदू वानखेडे यांची कथा कविता चित्र समाजाची बोलत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा परिघ स्थिर करण्यासाठी त्यांनी हे माध्यम गंभीरपणे निवडलेले आहे. त्यांच्या कविता, कथेतील चिंतन मला मोलाचे वाटते .जोपर्यंत समाजात उपेक्षित माणसे आहेत, जिथपर्यंत विषमता आहे, जिथपर्यंत विचार प्रणालीचा संघर्ष आहे, तिथपर्यंत प्रा. नंदू वानखडे यांची कविता कथा, चित्र, जिवंत राहतील. असा आशावाद त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला.

 ‘ज्याला नाही माय’ कथासंग्रहाविषयी बोलताना प्रमोदकुमार अणेराव म्हणाले की, ग्रामीण भागातील जीवनमान, त्यांची घालमेल, अंधश्रद्धा, स्वाभिमान प्रतिष्ठान, आणि बेगडी विज्ञाननिष्ठा, या सगळ्या बाबीवर अतिशय खोलवर चिंतन या कथेत आलेलं आहे. त्यांची कथा ग्रामीण स्वरूपाची आहे त्यातून मानवता वादाचा शोध घेत ती फिरते आहे .

नंदू वानखडे यांचा पिंड हा कवितेचा असला तरी ते कथेच्या प्रांतातही भरारी मारू इच्छित आहेत. त्यांचाच पहिला हा कथासंग्रह आहे. तो विविध अंगाने परिपूर्ण झाला आहे. पण त्यांची कविता मात्र अधिक प्रगल्भपणे विविध अंगाने सर्व दूर पोहोचली आहे. त्यांनीच काढलेली उत्तम रेखाटने ही या कथेची जमेची बाजू आहे. त्यांच्या रेषा बरच काही सांगून जातात.

नंदू वानखडे यांच्या कवितेवर तिसरे पुष्प गुंफण्यासाठी डॉ. सुरेश कुमार खोब्रागडे यांनी नंदू वानखडे यांची कविता वर्तमान परिस्थितीचा लेखाजोखा मांडते. तसेच ती निर्णायक भूमिका घेत समाज जागृती व सजगता निर्माण करते.. अंतर्मनातली आंदोलने ‘या कवितासंग्रहातील अत्यंत प्रगल्भतेच्या, उंचीच्या आहेत. त्या सरळ साध्या भाषेत रसिकाच्या वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवतात.

यावर्षी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरा करीत असताना सर्व व्याख्यात्यांचं पुष्पगुच्छ ऐवजी तृणधान्याचं महत्व सांगून त्यांना पाच प्रकारची तृणधान्याची टोपली देऊन स्वागत करण्यात आले . त्यामुळे ज्वारी बाजरी राळा नाचणी या तृण धान्याचा समावेश आहारात करण्याचा मौलिक संदेश दिल्या गेला.

विचारमंचावर डॉ. भालचंद्र जोशी ज्येष्ठ संवादतज्ञ समीक्षक, पूर्वाध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समीक्षक युवराज प्रमोद कुमार अनेराव , डॉ. सुरेश खोब्रागडे( ज्येष्ठ कवी नाटककार), कवी, नाटककार चित्रकार प्रा. नंदू वानखडे मुंगळा हे उपस्थित होते.

यावेळी माणिक गेडाम, डॉ. सविता बेदरकर, किरण कुमार इंगळे अकोला, कालिदास सूर्यवंशी, बापू इलमकर, प्रा. मिलिंद रंगारी, प्रा. राहुल तागडे, प्रा. भगवान साखरे, किरण मोरे… महेंद्र दीहारे व बऱ्याच संख्येने

 उपस्थिती होती. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या हस्ते जय नंदू वानखडे व रक्षित नंदू वानखडे यांच्या ‘टू ब्रदर्स चित्र प्रदर्शनीचे’ अर्थात बालवयात काढलेल्या सुमारे 110 चित्राचे चित्र प्रदर्शन प्रदर्शनाचे उद्घाटन यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सह मी ‘भिमाची रमा ‘”या एकपात्री प्रयोगाचा एक भाग महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलाकार कु. जुही नंदू वानखडे या मुलीने सादर करून प्रबोधन केले. आभार प्रदर्शन गौतम गजभिये यांनी केले. संतागार विहाराच्या संचालक मंडळांनी घेतलेल्या’ मंगल कामनेसह ‘कार्यक्रम संपन्न झाला.