असियान – भारत युद्ध अभ्यासाने चीनचा तिळपापड

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

दिनांक ७ आणि ८ मे रोजी दक्षिण चिन समुद्रात भारत आणि असियान देशातील सदस्य राष्ट्रांचनी नौदलाने संयुक्त युद्ध अभ्यास केला. या युद्ध अभ्यासात भारताव्यतिरिक्त फिलिपिन्स, इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ब्रूनेयी आणि व्हिएतनाम या देशाचा सहभाग होता. या सर्व देशांना मिळून आसियान समूह असे संबोधले जाते. या समूहात मुख्य देश हा भारत आहे. या समूहात सहभागी असलेले इतर देश लहान आणि सामर्थ्यहीन आहे. हा समूह तयार करण्यासाठी भरतानेच पुढाकार घेतला होता.

आशिया खंडातील लहान आणि तुलनेने सामर्थ्यहीन असलेल्या देशांना आर्थिक आणि लष्करी मदत करणे हा त्यामागचा उद्देश तर आहेच पण सोबतच इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देणे हा देखील त्यामागचा एक उद्देश आहे त्यासाठीच भारतीय नौदलाच्या पुढाकाराने हा युद्ध अभ्यास घेण्यात आला. अर्थात यात नवे असे काही नाही जगभरात असे युद्ध अभ्यास चालूच असतो. या युद्ध अभ्यासामुळे चीनचा मात्र नेहमीप्रमाणे तिळपापड झाला. चीनने या युद्ध अभ्यासाच्या वेळी हेरगिरी केल्याचा दावा असियान देशांनी केला आहे. युद्ध अभ्यासाच्या ठिकाणाहून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर चीनची जहाजे फिरत होती तसेच चीनची लढाऊ विमानेही घिरट्या घालत होती अर्थात चीनने नेहमीप्रमाणे याचा इन्कार केला असून आम्ही हेरगिरी केली नसून आमची ही जहाजे नौदलाची नसून व्यापारी जहाजे असल्याचा दावा चीनने केला आहे मात्र चीनचा हा दावा जगाची दिशाभूल करणारा आहे हे सांगायला कोणा तज्ज्ञांची गरज पडत नाही.

चीनच्या ओठात एक आणि पोटात दुसरेच असते हे जग जाणून आहे. इंडो पॅसिफिक क्षेत्रात वर्चस्व मिळवणे हे चीनचे स्वप्न आहे. हे स्वप्न भारतामुळे पूर्ण होऊ शकत नाही हे चीन जाणून आहे त्यामुळेच तो दक्षिण आशिया तसेच इंडो पॅसिफिक क्षेत्रातील छोट्या छोट्या देशांना साम दाम दंड भेद या मार्गाने आपल्याकडे वळवू इच्छित आहे. त्यासाठी त्याने अनेक देशांना अब्जावधी रुपयांचे कर्ज देऊन आपल्याकडे वळवले आहे. श्रीलंकेची आज जी अवस्था झाली आहे त्याला चिनही जबाबदार आहे चीनने श्रीलंकेला न फेडता येईल इतके कर्ज दिले त्या बदल्यात त्यांनी श्रीलंकेच्या अनेक बंदरावर ताबा मिळवला. श्रीलंकेचे हंबनटोटा नावाचे बंदर तर चीनने घशात घातले आहे या बंदरावरून तो दक्षिण आशिया आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रावर लक्ष ठेवून असतो. या बंदराचा वापर तो हेरगिरीसाठी करतो.

श्रीलंकेप्रमाणेच नेपाळ, भूतान, बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार या देशांबाबतही चीनने हेच धोरण अवलंबले आहे मात्र आसियान देश चीनच्या या दबावाला अद्याप बळी पडले नाही. चीन आणि फिलिपिन्स या देशांमध्ये सागरी वाद आहे चीन आपल्या सागरी हद्दीत बेकायदेशीर प्रवेश करतो म्हणून फिलिपिन्सने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दारे ठोठावली आहे. चीनचा हा सागरी वाद केवळ फिलिपिन्स सोबतच नाही तर असियांन देशातील इतर देशांसोबतही आहे आणि चीन या छोट्या देशावर कायम दादागिरी करत असतो म्हणूनच चीनची दादागरी रोखण्यासाठी हे छोटे देश भारताकडे आशेने पाहत आहेत. भारतही या देशांना हवी ती मदत देत आहे त्यामुळेच या समूहाकडे चीन वक्रदृष्टीने पाहत आहे. भारत आसियान देशांना बळ देत असल्याने इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनच्या निरंकुश वर्तनाला आळा बसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here