माणगांव नगरपंचायतमध्ये भाजपचे नवंनिर्विचित नगरसेवक राजेश मेहता याची माणगांव नगराध्यक्षपदी निवड…

56

माणगांव नगरपंचायतमध्ये भाजपचे नवंनिर्विचित नगरसेवक राजेश मेहता याची माणगांव नगराध्यक्ष पदी म्हणून निवड…

✍️सचिन पवार ✍️

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-माणगांव नगरपंचायतमध्ये संध्याची संख्याबल पाहिली तर माणगांव शहर विकास आघाडीकडे एकूण ९ जागा असून राष्ट्रवादी व शेकाप आघाडीकडे एकूण ८ जागा आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या हर्षदा सुमित काळे यांनी राजेश मेहता याच्या विरुद्ध उपनगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला होता. परंतु उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हर्षदा सुमित काळे हिचा पराभव करीत राजेश मेहता विजयी म्हणून घोषित करण्यात आले. उपनगरध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर राजेश मेहता असे म्हणाले की माझ्यावर विश्वास दाखवीत जी जबाबदारी मला दिली ती मी निश्चितच पूर्ण करीन व येत्या काळात माणगांव शहराच्या विकासात जास्त योगदान देण्याचा प्रयत्न मी करीन.

माणगांव नगरपंचायत मध्ये शिवसेना व भाजप एकत्र येत २०२२ मध्ये बहुमत घेत निवडणूक लढवली होती माणगांव नगरपंचायतमध्ये सचिन बोबले यांनी सव्वा वर्ष माणगांव नगरपंचायतमध्ये उपनगराध्यक्ष पद सांभाळ्यानंतर पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे त्याच्या रिक्त जागेवर भाजपचे राजेश मेहता यांनी १७ मे बुधवार रोजी झालेल्या निवडणुकीत बाजी मारून यश प्राप्त केले. यावेळी उपस्थित मान्यवराकडून राजेश मेहता यांना पुष्पहार घालत पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले तसेच निवड जाहीर झाल्यावर फाटक्याची आतिषबाजी करीत माणगांव बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली.