तयार रहा…मान्सून येणार ‘या’ तारखेला, हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

51

तयार रहा…मान्सून येणार ‘या’ तारखेला, हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

जितेंद्र कोळी

पारोळा प्रतिनिधी 

मो: 9284342632

मुंबई – यंदा महाराष्ट्रात 8 जून 2023 रोजी मान्सून प्रवेश करणार आहे. या नंतर सम्पूर्ण राज्यात 22 जूनप्रयन्त मान्सून चा पाऊस असल्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.

संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना डख म्हणाले, गेल्या तीन ते चार दिवसापासुन तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाळ झाली आहे.

आणखी चार ते पांच दिवस तापमान वाळलेलं राहणार आहे. सुमारे 45 अंश सेल्सिअस प्रयन्त तापमान पोहोचणार आहे. तापमाणात प्रचंड उकाडा वाढणार असल्याचे डख यावेळी म्हणाले.

हे आपण वाचलंत का?

 

उन्हाळ्याचा कालावधीत मे महिन्यात पुन्हा 11 ते 16 मे रोजी दरम्यान राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.

17 मे नंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडेल. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची सर्व कामे 16 मे प्रयन्त पुर्ण करून घ्यावी. असे डख यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

मान्सून चा पाऊस 8 जूनला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 22 जून प्रयन्त तो संपूर्ण राज्य भरात पडणार आहे. यानंतर 26 व 27 जूनला शेतकरी बांधवांनी खरीपाच्या पेरण्या कराव्या.

जूनपेक्षा जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार आहे. त्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.