मुंबई गोवा महामार्गांवर मोटारसायकला एका अज्ञात वाहनानी ठोकर देऊन केला पोबारा अपघातात एक ठार एक गंभीर जखमी….

75

मुंबई गोवा महामार्गांवर मोटारसायकला एका अज्ञात वाहनानी ठोकर देऊन केला पोबारा अपघातात एक ठार एक गंभीर जखमी….

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

माणगांव :-दि.१८ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मौजे भुवन गावच्या हद्दीत मुंबई गोवा हायवेवरील हॉटेल जोशी समोर मोटारसायकल क्रमांक एम एच ०६ बी एफ २६८३ ही कोलाड येथून घरगुती सामान घेऊन आपल्या निलज या गावी येत असताना एका अज्ञात वाहनांनी ठोकर मारून पोबारा केला यांच्यात मोटारसायकलवर असलेले मुकेश शिंदे वय वर्ष ३२ रा. निलज माणगांव यांना गंभीर स्वरूपात दुखापत झाली असून त्याच्या पत्नी अरुणा मुकेश शिंदे वय वर्ष ३० रा. निलज ता. माणगांव या जागीच मयत झाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की मुंबई गोवा महामार्गावरील माणगांव तालुक्यातील मौजे भुवन येथे मोटारसायंकाळ क्रमांक एम एच ०६ बी एफ २६८३ हिला एका अज्ञात वाहनांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून तसेच हायगायीने बेकायदेशीर अतिवेगाने वाहन चालवीत मोटारसायकला जोरदार ठोकर मारून पोबारा केला या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्यात समजतात माणगांव पोलीसं घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कॉ गु रजि नं १५४ /२०२३ भा द वि सं कलम ३०४ (अ ),२७९,३३७,३३८ मो वा अधि कलम १८४,१३४ गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास माणगांव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस सब इन्स्पेक्टर पाटील व पोलीस हवालदार दोंडवुलकर हे करीत आहेत.