माणगांव तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हाठभट्टींवर पोलिसाचा छापा…

69

माणगांव तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी गावठी हाठभट्टींवर पोलिसाचा छापा…

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो: 8080092301

रायगड :- माणगांव तालुक्यातील रुद्रवली आदिवासी वाडी,महादपोली व सुर्ले आदिवासीवाडी या ठिकाणी गावठी हातभट्टी तयार केलेली दारू व नवसागर गूळ मिश्रित केलेली दारू माणगांव पोलिसांनी सापळा रचून घेतली ताब्यात.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की रुद्रवली गावच्या हद्दीत पूर्वेकडील रस्त्याच्या दक्षिणेस आंब्याच्या झाडाखाली आरोपी राईजा बाबुराव पवार वय वर्ष ३० रा. रुद्रवली आदिवासीवाडी येथे १५०० रुपये किंमतीची दोन प्लास्टिक ड्रम प्रत्येकी कॅनमध्ये ५ लिटर दारू १०० रुपये प्रमाणे स्वतः च्या फायद्याकरिता बनवित असताना आढळून आला तसेच महादपोळी या ठिकाणी आरोपी सुभाष तुकाराम पवार वय वर्ष ३५ रा. महादपोळी ता. माणगांव यांनी २० रुपये किमतीचा प्लास्टिकचा ड्रम त्यात ४ लिटर हातभट्टी गावठी दारू कॅनसह रुपये १५०० व रुपये ३००लिटर गूळ नवसागर सहित पकडले.

 

त्याच प्रमाणे सुर्ले आदिवासीवाडी ता. माणगांव आरोपी संतोष पांडुरंग जाधव वय वर्ष ४२ रा. सुर्ले आदिवाशी ता. माणगांव ५२० रुपये लिटरचा किमतीचा प्लास्टिकचा ड्रम त्यात ५ लिटर गावठी हातभट्टीची तयार केलेली दारू व २००० रु.४०० लिटर गूळ नवसागर मिश्रित रासायनं माणगांव पोलिसांनी केले जप्त या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रामनाथ डोईफोडे व मोरेश्वर ओमले पो. हवालदार यांनी माणगांव पोलीस ठाण्यात दिली असून आरोपी एक याच्यावरती कॉ गु रजि नं १५५/२०२३ दारूबंदी १९४९ चे कलम ६५ खंड (ई ) प्रमाणे आरोपी नं दोन कॉ गु रजि नं १४०/२०२३ दारूबंदी कलम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नं.३ संतोष जाधव याच्या विरोधात कॉ गु रजि नं १४१/२०२३ दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे माणगांव पोलीस ठाण्यात केला असून माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील याच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास म. पो. ना.धनावडे, पो. हवालदार तुनतुने पो. हवालदार दोंडवुलकर हे करीत आहेत.