रिसॉर्टवर छापा, सहा डान्सर मुलींसह 12 पुरुषांवर कारवाई…

57

रिसॉर्टवर छापा, सहा डान्सर मुलींसह 12 पुरुषांवर कारवाई…

त्रिशा राऊत 

नागपूर ग्रामीण प्रतिनिधी 

मो 9096817953

उमरेड. नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड कऱ्हांडला परिसरात असलेल्या पॅराडाईज रिसॉर्टवर पोलिसांकडून छापा टकण्यात आला आहे. रिसॉर्टमधील दृष्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या रिसॉर्टमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकला. रिसॉर्टमध्ये झिंगाट पार्टी सुरू होती, पोलिसांनी या प्रकरणात सहा डान्सर मुलींसह 12 पुरुषांवर कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान विदेशी दारूचा मोठा साठा तसेच रोकड देखील जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड कऱ्हांडला परिसरात असलेल्या पॅराडाईज रिसॉर्टवर पोलिसांकडून छापा टकण्यात आला आहे. रिसॉर्टमधील दृष्य पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या रिसॉर्टमध्ये झिंगाट पार्टी सुरू होती. अश्लील नृत्य सुरू होते. पोलिसांनी या प्रकरणात सहा डान्सर मुली आणि बारा पुरुषांवर कारवाई केली आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे या कारवाईत नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही प्रतिष्ठित नागरिक आणि डॉक्टरांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

विदेशी दारूसह रोकड जप्तदरम्यान या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी दारूचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे. तसेच रोकड देखील जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

या आधीही ब्राह्मणी येथे ‘न्यूड डान्स’चा विडिओ व्हायरल झाला होता. या आधी ही उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी येथे ‘न्यूड डान्स’ प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मणी येथे ‘नग्न नृत्य’ केल्याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) १० जणांवर कारवाई केली होती. ब्राह्मणी येथे शंकर पाटाचे आयोजन केल्यानंतर नागपूरच्या अ‍ॅलेक्स डान्स शोच्या महिला कलाकारांनी मंडपात अश्लील नृत्य केले होते ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी कारवाई केली.