डोळखांब बाजारपेठेतील बार -परमिटरूम बंद करण्याचा ठराव..तरीही पेसा क्षेत्रात नियमबाह्य परमिटरूम सुरूच
सचिन पवार
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301
डोळखांब :-शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलिस स्थानकाच्या हद्दीतील डोळखांब या मुख्य बाजारपेठेतील नियमबाह्य मयुर बार व परमिटरूम बंद करण्याचा ठराव डोळखांब ग्रामपंचायत च्या ग्रामसभेमध्ये घेण्यात आला. परंतु पेसा क्षेत्रातील नियमबाह्य बार व परमिटरूम बंद करण्याची ठोस अंमलबजावणी झाली नसल्याची तक्रार रिपाई चे तालुका उपाध्यक्ष यशवंत घनघाव यांनी मंत्रालयातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सचिवांना केली आहे.
शहापूर तालुक्यातील डोळखांब मुख्य बाजारपेठेत शहापूर येथील व्यवसायीक श्रीकांत भानुशाली यांच्या मालकिचे घर क्रमांक. 651 मधील गाळा नं.1 मध्ये मयुर बार आणि परमिटरूम नावाने चार महिन्यापासून व्यवसाय सुरू आहे.या व्यवसायासाठी विरोधी सदस्यांचा तसेच दिवंगत ग्रामपंचायत सदस्य संतोष गायकवाड यांचा पुर्णपणे विरोध असतांना तसेच मागिल ग्रामसभेत कोणत्याही प्रकारचा नाहरकत देण्याचा किंवा परवानगी देण्याचा ठराव झालेला नसतांना खोट्या कागदपत्रांचे अधारे शासनाची दिशाभुल करून नियमबाह्य पध्दतीने मयुर बार व परमिटरूम सुरू असल्याचे घनघाव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
डोळखांब पेसा क्षेत्रात येत असल्याने मुख्य बाजारपेठेत हा परमिटरूम सुरू ठेवण्यासाठी किंवा परवानगीसाठी महिलांच्या विशेष ग्रामसभेचा ठराव तसेच मान्यता असने महत्वाचे आहे.डोळखांब ही मुख्य बाजारपेठ असल्याने याठिकाणी परिसरातील 85 खेड्यापाड्यातील नागरिक तसेच विद्यार्थी यांचा राबता या रस्त्यावरून असतो. परंतु परमिटरूम मुख्य रस्त्यावर च असल्याने येजा करणार्या नागरिकांना त्रास होत आहे. तसेच रात्री उशिरा पर्यंत बार सुरू असल्याने बर्याच वेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ही निर्माण होत आहे. परमिटरूम च्या चारही बाजुला वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याने याठिकाणी येणार्या रूग्णांना देखील त्रास होत आहे.तसेत तरूणांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे.
मयुर बार व -परमिटरूम बंद करण्याच्या तक्रारी येथील काही नागरिकांनी तसेच यशवंत घनघाव यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे केल्यानंतर तसेच महिलांचा संताप अनावर झाल्यानंतर दि.24/11/2022 रोजी च्या ग्रामसभेत सदरहु परमिटरूम बंद करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला असुन ,तरी देखील नियमबाह्य पध्दतीने सुरू असलेला हा परमिटरूम व बार पाच महिन्यापासून अवैद्यरित्या सुरूच आहे. याबाबत रितसर ग्रामसभेचा ठराव माहिती अधिकाराखाली अपिल करूनही मिळत नव्हता अखेर काल दि.17 मे रोजी ठरावाची प्रत मिळाली असुन ,आतातरी तात्काळ हा मयुर बार बंद झाला नाही तर पंधरा दिवसानंतर या विरोधात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा रिपाई चे घनघाव यांनी निवेदनातुन दिला आहे.
तसेच यापुर्वी या बार आणी परमिटरूम साठी लागणारे ठराव व नाहरकत दाखले हे यापुर्वी च्या ग्रामसभेत विषय नघेता मासिक सभेत घेण्यात आले होते.यावेळी नऊ ग्रामपंचायत सदस्यांपैकी चार सदस्यांनी विरोध दर्शविला होता.मात्र डोळखांब हे पेसाक्षेत्र असल्याने ग्रामपंचायत कायद्यानुसार या बार आणी परमिटरूम साठी महिला ग्रामसभेचीच परवानगी लागते.परंतु यापुर्वी चे सर्व कागपत्र बोगस असुन या प्रकरणाची संबंधित खात्यामार्फत सखोल चौकशी करावी तसेच खोटे कागदपत्र देणार्या ग्रामसेवक संदिप चौधरी यांची देखील चौकशी करून ठोस कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
मयुर बार व परमिटरूम ची सखोल चौकशी करून संबंधित अधिकार्यांनी ठोस कारवाई करावी.अन्यथा लवकरच संबंधित बार व परमिटरूम विरोधात तसेच यंत्रणेला पाठिशी घालणार्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यां विरोधात उपोषणाच्या मार्गाने न्याय मागणार आहोत.यशवंत घनघाव तक्रारदार
संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून या प्रकरणातील अनियमितता तपासुन ठोस कारवाई करू: आर .बी. भोसले विस्तार अधिकारी पं.स.शहापूर
हा ठराव फक्त बार अँड रेस्टॉरंट करिता नसून संपूर्ण डोळखांब ग्रामपंचायत मधील दारू बंदी असा घेण्यात आला आहे तरीसुद्धा सर्व धंदे अजूनही चालूच आहेत: नितीन मधुकर चौधरी, संस्थापक अध्यक्ष छत्रपती राजे युवा संघटना महाराष्ट्र राज्य