कोणत्या संतांवर विश्वास करताय?

अंकुश शिंगाडे

मो:९३७३३५९४५०

            संत……..खरा संत आज दिसतच नाही. ख-या संताला देश पारखा झालाय असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आज देशात अशीच संतांची ख्याती निर्माण झाली आहे. आजचे संत हे पोटभरु असून व्याभीचार मुक्तही नाहीत. 

            संत हे कालही होते. आजही आहेत आणि उद्याही राहणार. कालच्या संतांचा इतिहास पाहता, काल जे संत झाले, त्या संतांची परीक्रमा वाखाणण्याजोगी होती. ते संत लोकांना दिशा दाखविण्याचं काम करीत. प्रसंगी अशी दिशा दाखवीत असतांना येथील दांभीक समाज आपल्याला वाळीत टाकेल याची पर्वाही करीत नसत. त्यांचं जे कार्य असायचं, त्यात स्वार्थपणा नव्हताच. आज त्यांचा इतिहास वाचला की आपल्या अंगावर शहारे उमटतात. उदा. संत एकनाथ महाराजांचं उदाहरण घेवू. ते नदीवर स्नानाला गेले असतांना त्यांच्या अंगावर एक व्यक्ती त्यांची अंघोळ झाल्यावर थुंकला, त्यानंतर पुन्हा अंघोळ केल्यावर पुन्हा थुंकला. असा थुंकण्याचा प्रकार एकशे एक वेळा चालला व त्यांनी न रागावता एकशे एक वेळा अंघोळ केली. आजचा संत जर असता तर त्यानं फक्त दोनचार वेळा अंघोळ केली असती. पाचव्यांदा थोबाडीत मारली असती. हा आहे पुर्वीच्या संताचा महिमा.

पुर्वीचे संत मुक्या प्राण्याचा जीव वाचवितांना तो आपल्याला इजा करीत आहे. याचा विचार करीत नव्हते. एकदा एक विंचू पाण्यात पडत असतांना त्या संताला वाटले की फुकटच पाण्यात राहून याचा जीव जाईल. त्यानं त्याला बाहेर काढलं. तेव्हा त्या विंचवानं त्याला दंश केला. तसा परत तो पाण्यात पडला. तसं परत त्या संतानं त्याला बाहेर काढलं. परत त्यानं चावा घेतला. असं बरेचदा घडलं. परंतू ना संतानं आपलं कार्य बंद केलं, ना विंचवानं. शेवटी त्या संतानं त्याचा जीव वाचवला. त्यानंतरच त्यानं दम घेतला. आजचा संत असता तर त्यानं त्या प्राण्यांचा जीव वाचवला नसता, उलट त्याला यमसदनी पोहोचवलं असतं.

हे आपण वाचलंत का?

 

          संत ज्ञानेश्वर………संत ज्ञानेश्वरांना आपण संत म्हणतो, परंतू त्यांना तत्कालीन परिस्थितीत किती त्रास सहन करावा लागला याची कल्पना करवत नाही. माधुकरी मागतांना त्यांना माधुकरीही मिळायची नाही. अक्षरशः उपाशी झोपावं लागायचं. परंतू आजच्या संतांजवळ एवढं घबाड असतं की ज्यांची संपत्ती मोजताच येत नाही. एवढी प्रचंड स्वरुपात संपत्ती असते. मोठमोठे आश्रम असतात. ही संपत्ती येते कुठून? काय संत कामाला जातात? कारखान्यात मेहनत करतात? मजूरी करतात की त्यांचे मोठमोठे उद्योग असतात? तरीही त्यांच्याजवळ मोजता येत नाही, एवढी संपत्ती. खरं तर ही संपत्ती जप्त व्हायला हवी. कोणी म्हणतात की ही संपत्ती त्यांना दान म्हणून मिळालेली असते. हो, ठीक आहे. दानात मिळालेली संपत्ती. मग ही संपत्ती घेतातच कशाला दानात? अन् समजा एखाद्यानं दानात अशी संपत्ती दिलीच तर ती संपत्ती वाटून द्यावी ना गरीबांना. त्यांच्या तरी कामात येईल ती संपत्ती. परंतू आजचे संत तसे करीत नाहीत. कारण ते मुळात संतच नाहीत. 

            खरे संत हे पुर्वीच्या काळातील. हे मी आधीच म्हटलंय. संत तुकारामांनी आपल्या इह गोष्टीचा त्याग केला व ते डोंगरावर जावून बसले. संत रामदास स्वामींनी आपल्या संसाराचा त्याग केला व ते विवाह करतेवेळी कायमचेच सावधान झाले. आयुष्यभर ब्रम्हचर्य सांभाळला. त्यांनी व्याभीचार अजिबात केला नाही. अन् आजचे संत व्याभीचारी आहेत, हेही सिद्ध झालंय. ते स्वतःला ब्रम्हचारी समजतात. ब्रम्हचारी असल्याचं सांगतात. तसं दाखवतातही. परंतू त्यांची सेवा करायला कितीतरी कौमार्य वयातील मुली असतात नव्हे तर ते तशा कौमार्य वयातील मुलींचा लैंगिक अत्याचार करण्यासाठी वापर करीत असतात. हे आजचे संत आणि आपण अशाच संतांची विश्वास ठेवून त्यांना एवढे मानतो की त्याच्यासारखा आपल्याला कोणी देवच मिळालेला नाही. तोच आपला जणू खराखुरा आणि सर्वात मोठा देव आहे. 

            संताबाबत महत्वाचं सांगायचं झाल्यास खरा संत हा परमार्थ साधणारा असायला हवा. त्याच्याजवळ राग, लोभ, मद, मत्सर नसावा. गडगंज संपत्ती नसावी. समजा कोणी जबरदस्तीनं संपत्ती दानात दिलीच तर ती वाटून द्यावी गोरगरीबांना. समाजात असे गोरगरीब भरपूर असतात. तो ज्ञानी असावा. संसारी असला तरी चालेल, परंतू व्याभीचारी नसावा. त्यानं समाजाला आपल्या वाणीतूनच नाही तर आपल्या कर्तृत्वातून दिशा द्यावी. नाहीतर आजचे संत, बोलतात एक आणि कर्तृत्व दुसरंच असतं. संतांजवळ भक्तांबाबत भेदभाव नसावा. कारण आजच्या संताजवळ भेदभावही दिसतो. ते धनिकांना जवळ करतात आणि गरीबांना दूर लोटवतात अशी अशी स्थिती आढळून येते. ते जेव्हा व्याख्यान द्यायला येतात. तेव्हा त्यांच्या व्याख्यानात गरीबांना प्रवेश नसतोच. खुर्च्या लावलेल्या असतात. त्या खुर्च्या अशा लावलेल्या असतात की लोकांच्या थाटबाटानुसार त्यांच्या जागा ठरलेल्या असतात. जो जास्त पैसा देईल. तो पहिल्या रांगेत. जो नाही देणार, त्याला शेवटच्या रांगेत. तसंच या ठिकाणी भेट भिका-यांना प्रवेश नसतोच. तसाच येणारा संतही एसीच्या गाडीतून येत असतो. जे व्याख्यान सभागृह असतं, त्या सभागृहातही एसी व्यवस्था केलेली असते. त्यांचं अन्न आपल्यासारखं सामान्य स्वरुपाचं नसतं. महागडे फुंकर वा महागडे ड्रायफ्रुट खात असतात ते.

           विशेष सांगायचः म्हणजे आपण कोणत्या संतावर विश्वास करायचा. कोणाला खरा संत समजावल्या? हे एक प्रकारचं कोडच आहे. या आजच्या एसी गाडीमधून फिरणा-या, स्वतः महागडे फुंकर वा महागडे ड्रायफ्रुट खाणा-या, स्वतःला संत समजून भोंदू तत्वज्ञान मांडणा-या, श्रीमंत गरीब असा भेदभाव करणा-या, गडगंज संपत्ती आपल्या नावावर ठेवणा-या, व्याभीचार करणा-या, कौमार्य मुलींना छळणा-या दांभीक लोकांना संत मानावं की जो स्वार्थी नाही. ज्यांना अजिबात लोभ नाही, ज्याला राग येत नाही, ज्याच्याजवळ अहंकार नाही, ज्याच्याजवळ अजिबात संपत्ती नाही, जो ज्ञानी आहे, तसंच जो संसारी आहे, परंतू शिलवान आहे. जो सामान्य माणसात मिसळतो, अजिबात भेदभाव नसतो त्याच्याजवळ. अशांना संत मानावे. 

          आज अशाच संतांची वानवा आहे. आज असा संत कुठेच आढळत नाही. आढळूनही येत नाही. आज संत शेकडो आहेत. संमेलन भरविल्यास त्याची प्रचिती येईल. परंतू खरे संत दिसणार नाही, जे काल दिसत होते. जनकल्याणासाठी आपला जीवही दावणीला लावणारे. ते होते, म्हणून समाज तरी जाग्यावर होता. त्यांनी ख-या अर्थानं समाजसुधारणा केल्या. त्यासाठी समाजाचे त्यांच्यावर होणारे अत्याचार सहन केले. परंतू आपले ध्येय सोडले नाही. समाजानं तर त्यांचं कार्य पाहून त्यांच्या हत्या केल्या आणि आजचे संत त्यांच्याविरुद्ध बोलणा-यांच्या हत्या करतात आणि आपल्याच आश्रमात पुरुनही टाकतात. त्यामुळंच विचार येतो की हे संत आहेत की संतांच्या बुरख्याआड लपलेले गुंड. त्यामुळंच विचार येतो की कोणत्या संतावर विश्वास करायचा? 

हे आपण वाचलंत का?

 

          आज खरं सांगायचं म्हणजे आज खरे संत सापडतच नाहीत. सापडणारही नाहीत. असतीलही दोनचार खरे संत. परंतू आपले लक्ष त्यांचेकडे गेले नाही. जात नाही. कारण आपणच खोटेपणाचा, स्वार्थीपणाचा व अहंकाराचा बुरखा ओढलेला आहे आपल्या स्वतःच्या आदर्श असणा-या आपल्या शरीरावर. तो बुरखा जेव्हापर्यंत आपण हटवणार नाही, तेव्हापर्यंत आपल्याला खरा संत दिसणार नाही वा ओळखताही येणार नाही. त्यामुळंच आपण आजच्या दांभिक संतावर विश्वास करुन.व त्यांच्या अत्याचाराला बळी पडू. यात शंका नाही. मात्र जे आजच्या काळातील आदर्शवादी असतील, त्यांच्या मनात नेहमी प्रश्न उपस्थीत राहिल की खरा संत कोणाला म्हणावे? ते सहज विश्वास ठेवणार नाही आणि कोणाला ठेवूही देणार नाहीत हे तेवढंच खरं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here