माणगांव तालुक्यातील गणेश यशवंत वाघरे स्कूलचा एस एस सी परीक्षेचा निकाल १०० टक्के…

56

माणगांव तालुक्यातील गणेश यशवंत वाघरे स्कूलचा एस एस सी परीक्षेचा निकाल १०० टक्के…

सचिन पवार 
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301

माणगांव :-गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम स्कूल चा यावर्षीचा एस एस सी निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेत एकूण २७ विद्यार्थी पैकी २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून स्कूलचे व संस्थेचे नाव उंचावले आहे. यापैकी कुमारी मानसी राजेंद्र कोळवणकर हिने ९५.२० टक्के काढून प्रथम क्रमांक काढला तर गौरी श्याम बोबडे हिने ९३.४० टक्के काढून द्वितीय क्रमांक काढला,तृतीय क्रमांक पार्थ अविनाश साळवी याने ९३ टक्के काढले तर आशिष जानकर भूल याने ९१.४० टक्के काढून चतुर्थ क्रमांक काढला खुशबू अजितकुमार विश्वकर्मा ९१ टक्के, हर्ष बळीराम खडतर ९१ टक्के सार्थक दिनेश महाडीक ९१ टक्के अशा या सात विद्याथ्यांनी ९० ते १०० टक्के च्या घरात आपल्या यशाची बाजी मारली आहे.

हे आपण वाचलंत का?

 

माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळाचे गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये २०२२/२३ वर्षासाठी एस. एस. सी परीक्षेसाठी एकूण २७ विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी ९० टक्के च्या पुढे सात विद्यार्थी ८० ते ९० टक्के मध्ये ११ विद्यार्थी ७० ते ८० टक्केमध्ये ७ विद्यार्थी ६० ते ७० टक्के मध्ये २ विद्यार्थी यांनी आपली यशाची बाजी मारली. या सर्व विद्याथ्यांचे माणगांव शिक्षण प्रसारकं मंडळाचे अध्यक्ष अँड. राजीवजी साबळे गणेश यशवंत वाघरे स्कूल व सुधाकर नारायण शिपूरकर स्कूल च्या मुख्याध्यपिका सौ. मनीषा मोरे मॅडम व शिक्षक शिक्षेकत्तर कर्मचारी आणि कमिटी मेंबर यांच्याकडून अभिनंदनचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.