ओडिसा ट्रेन दुर्घटनेत मृत्युमुखी नागरिकांना व स्व. खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
अमित सुरेश वैद्य
मो: 7499237296
सालेकसा तालुका प्रतिनिधी
गडचिरोली: ओडिसा येथे झालेल्या रेल्वे अपघातात तीनशेहून अधिक नागरिकांचा जीव गेलेला आहे या सर्व नागरिकांना, सोबतच चंद्रपूर वनी आणि लोकसभा क्षेत्राचे खासदार काँग्रेस नेते स्व. बाळूभाऊ धानोरकर यांना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे रेल्वे अपघातात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.
https://mediavartanews.com/2023/06/04/prakash-ambedkar-latest-news/
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव कीरसान, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. नितीन कोडवते, चंदा कोडवते, भावना वानखेडे, सहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, समशेरखान पठाण, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, सहकार सेल उपाध्यक्ष अब्दुल पंजवानी, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, माजी नगरसेवक रमेश चौधरी, पांडुरंग घोटेकर, सुनील चडगुलवार, दत्तात्रय खरवडे, प्रतिक बारसिंगे, काशिनाथ भडके, हरबाजी मोरे, महादेव भोयर, संजय मेश्राम, भैयाजी मुद्दमवार, रमेश धकाते, मिलिंद बारसागडे, माजिद सय्यद, संजय वानखेडे, सर्वेश पोपट, जावेद खान, निकेश कामीडवार सह मोठ्या संख्येने काँग्रेस नेते पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.