कोकणात दोन दिवस मुसळधार पाऊस तसेच “बिपरजॉय “नावाचा चक्रीवादळ हवामान खात्याने वर्तविला आहे.

63

कोकणात दोन दिवस मुसळधार पाऊस तसेच “बिपरजॉय “नावाचा चक्रीवादळ हवामान खात्याने वर्तविला आहे.

सचिन पवार 

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301

माणगांव :-देशात हवामानचे वेग वेगळे रंग पाहायला मिळत आहेत कुठे कडक ऊन तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अरबी समुद्रात “बिपरजॉय “चक्रीवादळ घोगावत असल्याने आज सोमवार दि.५ जून पासून ७ जुनपर्यत मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

देशाची राजधानी दिल्लीत रविवारी पावसाची सुरवात झाली आहे. यादरम्यान जोरदार वारे वाहू लागले आहे. मुंबई आणि कोकणात चक्रीवादलामुळे मुसळधार पाऊस अरबी समृदात कमी दाब्याचे क्षेत्र तर राज्याच्या या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण पूर्व अरबी सम्रूदात ५ जून ते ७ जून पर्यत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. अरबी समृदात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस आणि अचानक पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यात मान्सून दाखल होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत ७ जुनपर्यंत अरबी समुद्रात कमी दबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे चक्रीवादळ विकसित होण्याची शक्यता असून या चक्रीवादळाचे नाव बिपरजॉय असेल हवामान खात्याने ७ जूनपर्यंत चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे. जर कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळत विकसित झाले तर ते अतिवृष्टीला चालना देऊ शकते यामुळे महाराष्ट्रभर मुसळधार पाऊस पडून अचानक पूर येण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबईत ८ ते १० जून दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपातर झाल्याने जोरदार पाऊस पडणार तसेच मुंबई आणि कोकणात ११ ते १२ जुनपर्यत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानी वर्तवली आहे. चक्रीवादळामुळे कोकणात अचानक पूर येण्याची शक्यता आहे.