रसिकांना मिळाली झाडीबोलीच्या कवितांची मेजवानी, माडे तुकुम येथील कविसंमेलन

कृष्णकुमार निकोडे

गडचिरोली, दि.७ जून:जिल्हा मुख्यालयालगत धानोरा रोडवर स्थित माडे तुकुम येथील कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. सदर कविसंमेलनातून काव्यरसिकांना झाडीबोलीतील कवितांची रसमय मेजवानी मिळाली.

     आजच्या समाजाचे प्रतिबिंब, झाडीबोलीची महती, प्रेमातील हुरहुर, नेत्यांचे दुर्मीळ दर्शन अशा विविध विषयांना स्पर्श करणारा कविसंमेलन माडे तुकुम येथे नुकताच संपन्न झाला. या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी नागपूर येथील लेखीका दिप्ती हस्ते विराजमान होत्या. गावपातळीवर सुध्दा झाडीबोली साहित्य मंडळ चांगले कार्य करत असल्याबद्दल त्यांनी मंडळाची स्तुती करून उपस्थित कवींनी सादर केलेल्या कविता दर्जेदार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

   या कविसंमेलनात डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांनी झाडीबोलीची महती सांगणारी लाडाची झाडी व मित्र ही गझल, डॉ.प्रवीण किलनाके यांनी सवत बायकोची ही हास्य कविता व गुरूजी ही रचना सादर केली तर संजीव बोरकर यांनी बेकार जमाना आला ही झाडीबोलीतील रचना व तेच होते ही गझल तसेच युवाकवी गजानन गेडाम यांनी आठवणींचा पारिजात ही रचना तर कार्यक्रमाचे आयोजक खेमराज हस्ते यांनी परिवर्तन व वाङमय ही रचना, गोगावचे कवी बावणे यांनी तूच गजानना आणि झाडीबोलीतील मन ही रचना, शेवटी देवेंद्र मुनघाटे यांनी मनुष्य जीवन जगत असताना व पुढाऱ्या येशील कधी परतून ही विडंबन रचना सादर केली.

     सदर कवीसंमेलनाचे संचालन संजीव बोरकर यांनी केले. तर आभार हेमराज हस्ते यांनी मानले. अशी माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजींनी आमच्या कार्यालयास दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here