समुद्रपूर वंचित बहुजन आघाडी नगर पंचायत निवडणूक संदर्भात बैठकीचे आयोजन.

51

समुद्रपूर वंचित बहुजन आघाडी नगर पंचायत निवडणूक संदर्भात बैठकीचे आयोजन.

प्रशांत जगताप

समुद्रपूर:- येथे वंचित बहुजन आघाडी चे पूर्व विदर्भ समन्वय समितीचे सदस्य किशोरभाऊ खैरकार यांच्या आदेशा नुसार जिल्हा उपाध्यक्ष कुणाल वासेकर यांनी नगर पंचायत निवडणूकि संदर्भात मा. डाॅ. ज्ञानेश्वर वासनिक (माजी) भारिप जिल्हा सचिव यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

नगर पंचायत व तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकि संदर्भात सखोल चर्चा झाली. पक्षाच्या वतीने उमेदवार उभे करण्यात येईल.समुद्रपूर ग्रामपंचायत निवडणूक राजू धाबर्डे, पंकज भगत, शैलेश कुत्तरमारे, हर्षल पाटील, गजानन पाझरे, व समुद्रपूरची नगरपंचायत निवडणूक मा. डाॅ. वासनिक व कांतीलाल देवढे यांच्या नेतृत्वात लढल्या जाईल व समुद्रपूर तालुक्यातील पक्ष बांधणीकरिता नवीन शहर, तालुका पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी सूचना वर्धा जिल्हाध्यक्ष अजय घंगारे यांनी केली. या बैठकीला महासचिव सिद्धार्थ डोईफोडे, ऍड.राजेश अंबादे, ऍड.किशोरभाऊ यावले,विक्रांत भगत उपस्थित होते,या बैठकीचे आभार प्रदर्शन अजय डांगरे यांनी केले.