बुटीबाेरी अपघात पतीचा मृत्यू, पत्नी जखमी.

53

बुटीबाेरी अपघात पतीचा मृत्यू, पत्नी जखमी.

बुटीबाेरी भरधाव माेटरसायकल राेडवर आडव्या आलेल्या गाईवर धडकली. त्यात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली.

बुटीबाेरी :- भरधाव माेटरसायकल राेडवर आडव्या आलेल्या गाईवर धडकली. त्यात पतीचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरखेडी बसस्टाॅपजवळ घडली.

गजानन किसन बारबुदे, रा. सिर्सी, ता. उमरेड असे मृताचे नाव असून, जखमी पत्नीचे नाव कळू शकले नाही. दाेघेही एमएच-31/बीयू-7773 क्रमांकाच्या माेटरसायकलने बुटीबाेरीहून सिर्सीला जात हाेते. गजानन माेटरसायकल चालवीत हाेते. दरम्यान, बाेरखेडी येथील बसस्टाॅपजवळ गाय आडवी आली. त्यांचा ताबा सुटल्याने माेटरसायकल गाईवर धडकली. यात दाेघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेघांनाही नजीकच्या शासकीय दवाखान्यात नेले. तिथे डाॅक्टरांनी गजानन यांना तपासणीअंती मृत घाेषित केले. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि 279, 337, 304 (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक माेरखडे करीत आहेत.