जमाकुडो येथे क्रांतीसुर्य विर बिरसा मुंडा यांच्या 123 व्या बलीदान दिनानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन

62

जमाकुडो येथे क्रांतीसुर्य विर बिरसा मुंडा यांच्या 123 व्या बलीदान दिनानिमित्त पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत आरोग्य विभागाच्या समन्वयाने मोफत आरोग्य शिबीराचे उत्कृष्ठ आयोजन

🖋️धुर्व कुमार हुकरे 

जमाकुडो प्रतिनिधी

9404839323

क्रांतीसुर्य विर बिरसा मुंडा यांच्या 123 व्या बलीदान दिनानिमित्त* मा. श्री. निखिल पिंगळे (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक, गोंदिया यांच्या संकल्पनेतून आणि मा. श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया (कॅम्प- देवरी) यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्सलग्रस्त 06 पोलीस ठाणे व 11 सशस्त्र दुरक्षेत्र अंतर्गत गावातील नागरिकांकरिता आरोग्य विभागाच्या समन्वयाने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येऊन राबविण्यात आले.

आयोजित आरोग्य शिबीरात विषमज्वर, हिवताप, सर्दी, खोकला, ताप, B.P. शुगर., सिकल सेल, C.B.C, तसेच रक्त तपासणी, तोंडाचे आजार, डोळे तपासणी, ईत्यादी आजाराच्या तपासण्या करून मोफत औषधोचार करण्यात आले.

[yotuwp type=”videos” id=”y4XNh7MxD4s” thumbratio=”169″]

सदर आरोग्य शिबिरा मध्ये सुमारे 2600 नागरिकांनी सहभाग नोंदवून आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. विर बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त पोलीस विभागाच्या पुढाकाराने नक्सलग्रस्त भागातील विविध अतिदुर्गम गावात आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराला नागरीकांनी अतिशय चांगले उत्स्फूर्त प्रतिसाद दिले असून जनतेकडून पोलिस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे नक्सलग्रस्त भागातील जनतेच्या उत्थानाकरिता गोंदिया पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमाने प्रत्येक नक्सलग्रस्त पोलीस ठाणे, सशस्त्र दुरक्षेत्र अंतर्गत वेळोवेळी विविध उपक्रम राबविण्यात येत असून जनतेने अश्या उपक्रमांचा जास्तीत – जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन पोलीस अधीक्षक मा. श्री. निखिल पिंगळे यांनी केले.

सदर उपक्रमात मोलाचे सहकार्य लाभलेल्या जिल्हा आरोग्य विभाग, तसेच शिबिरात सहभागी डॉक्टर आणि त्यांच्या चमुंचे मा. पोलीस अधीक्षक, श्री निखिल पिंगळे यांनी आभार व्यक्त केले.

नक्षलग्रस्त पोलीस ठाणे/ सशस्त्र दुरक्षेत्र चे प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनी अतिशय परिश्रम व मेहनत घेऊन 6 नक्षलग्रस्त पोलीस ठाणे आणि 11 सशस्त्र दुरक्षेत्र हद्दीतील गावात एकाच दिवशी आरोग्य शिबिर आयोजित करून उत्तमरीत्या ते पार पाडल्याने पोलीस विभागातील अधिकारी/अंमलदार यांचेही त्यांनी कौतुक करून यापुढे देखील असे उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या.