राज्य सरकारी महामार्ग अहेरी ते आलापल्ली या रस्त्याच्या कामाला सुरुवात
मारोती कांबळे
मीडिया वार्ता न्युज
गडचिरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राज्य सरकारी महामार्ग अहेरी ते आलापल्ली रत्याच्या कामाला सुरूवात झाले असुन . हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला लागून ७ किलोमीटर अंतर असुन त्यात वाहनांची वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे अनेकवेळा काम केले आहे. विशिष्ट कंत्राटदाराने टेंडर हातात घेऊन काम सुरू केले आहे. मात्र अनेक वेळा रस्त्याचे दागडूजी करूनही हा रस्ता खराब होत आहे. आता रस्त्यासाठी नवीन बांधकाम आणि दर्जेदार साहित्य आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट बांधकामाची अमलबाजवानी करावी अशी अपेक्षा गड़चिरोली जिला प्रमुख रियाज शेख यांनी दर्शवली.
[yotuwp type=”videos” id=”y4XNh7MxD4s” thumbratio=”169″]
रस्त्याच्या ठिकाणाहून कामासाठी चिन्हे आणि संकेत गायब आहेत. खड्डे आणि खराब रसत्याने अनेक अपघात घडू शकतात. याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रत्येक प्रवासी विचारत आहे. अहेरी ते आलापल्ली जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असुन इथे गाड़याची प्रचंड आवक जावक अस्ते . शिवसेना गडचिरोली जिल्हा मतदारसंघाचे अध्यक्ष रियाज शेख यांनी या प्रकरणी लक्ष घालत या रस्त्यावर अपघाताची वाईट परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यावरून येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेची मागणी केली आहे.
रस्त्याच्या सुधारणेसाठी विभागाला खडे बोल सुनवत रियाज शेख यांनी रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्ज्याचे आणि अंदाज पत्रक नुसार न झाल्यास आंदोलना चा इशारा दिला आहे.