स्वरचित बालगीत: पहिला पाऊस!

74

स्वरचित बालगीत: पहिला पाऊस!

कृष्णकुमार निकोडे

मो: ९४२३७१४८८३

 

आला आला आला पहिला पाऊस हा आला!

झाला झाला झाला मनाला आनंद हा झाला!धृ!

 

माझ्या अंगणात नाच त्याने मांडला!

मुले बाळे अम्ही फेर त्यासंगे धरला!

ओले अंगण, कोना कोना थिजला!

शुष्क अंगी पाऊस धारा झर झर झेला!१!

 

पाणी सांचलेले तुरूतुरू धावले!

माती जमवून त्यांस बांध घातले!

वाढ वाढून पाणी बांधच फुटले!

लोंढा धावला, आनंदा पूर आला!२!

 

पाणी अंगावर झेलून पोरे भिजली!

नाच नाचून अंगणी सारे थकली!

दाह अंगांगाचा क्षणी शांत झाला!

पहिला पाऊस हा पेरून मोद गेला!३!

 

घर घरचा लोंढा येऊन एकत्र मिळाला!

नाली तुंब तुंबून फोफावू लागला!

गावा बाहेर शेतात खुप सांचला!

शेत भिजले पाहून शेतकरी हसला!४!

 

सृष्टी सारी पावसात नहाली!

पशू पक्षी हरखली वृक्ष वेली!

जागा हो श्रीकृष्णदासा कामा लागा!

सांड निद्रा मी आलो, पाऊस म्हणाला!५!