प्राणी नामशेष होणार नाही याची काळजी घेवू या

73

डायनॉसोर नष्ट झाले. वाघ, सिंह, लांडगे हि नष्ट होणार…?


अंकुश शिंगाडे
नागपूर मो: ९३७३३५९४५०

अलीकडे काही प्राणी मुक्तपणे विहार करायला लागले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्यांना मिळालेलं संरक्षण. सध्या संविधानानुसार शासनानं त्यांना संरक्षण प्रदान केलेलं आहे. त्याचं कारणही तसंच आहे. ते म्हणजे त्यांची घटती संख्या. शिकारीदरम्यान त्यांची संख्या एवढी कमी झाली की काहींची संख्या नामशेष झाली आणि काहींची संख्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

आज परिस्थिती पाहिली की वास्तविकता दिसते. वाघ, सिंहासारखे हिंस्र प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कारण काय तर ते बारा वर्षापर्यंत पिल्लांना जन्मच देत नाही. अर्थात त्यांचा प्रजनन काळ हा बाराच वर्षाचा आहे. दुसरं कारण म्हणजे त्यांची झालेली शिकार. त्यामुळेही त्यांची संख्या अति कमी झाली. तसाच त्यांचा अधिवास. त्यानंही त्यांची संख्या अतिशय कमी झाली.

अधिवास…अधिवासानं कशी काय प्राण्यांची संख्या कमी होवू शकते? होय, अधिवासानंही प्राण्यांची संख्या कमी होवू शकते. अर्थात ते जिथे राहात होते. ते जंगल आज मानवाच्या गरजेनं लाकूडतोड झाल्यानं कमी झाले. तसेच ते माणसाच्या वस्तीत आणि सानिध्यात जगत असतांना त्यांना ते वातावरण मानवले नाही. त्यामुळंच त्यातील काही मरण पावले. कालचे डायनॉसोरही असेच मरण पावले. म्हणजे शिकारीमुळं नाही. ते एवढे अजस्र होते की त्यांची शिकारच करता येत नव्हती. मग ते शिकारीदरम्यान कसे मरणार? परंतू ते नामशेष झाले. का? तर त्याचं कारण म्हणजे त्यांचा अधिवास. 

https://mediavartanews.com/2023/06/13/amazon-forest-helicopter-accident-latest-update/

 

अधिवास…होय, अधिवासच. म्हणतात की डायनॉसोरची भूक फार मोठी होती. ते जिथं राहात होते. तिथं त्यांना बरोबर पुर्ण स्वरुपात खायला मिळालं नाही. ते खायला न मिळाल्यानं त्यांनी अधिवास बदलला. ते नवीन ठिकाणी राहायला गेले आपला परिसर सोडून. हा नवीन परिसर. या ठिकाणी त्यांना खायला तर मिळालंच नाही. उलट त्याठिकाणी असलेल्या बारीकसारीक इतर प्राण्यांनी त्यांना छळलं. त्यांची अंडे खाल्ली. अंड्यातून निघालेली अभ्रकं खाल्ली नव्हे तर त्यांची लहान लहान पिल्ले खाल्ली. याचाच अर्थ असा की त्यांची उत्पत्तीच होवू दिली नाही. मग जे वयस्क उरले दोन चार. त्यातील काहींना वातावरणाशी जुळवून घेता आलं नाही, ते त्यानं मरण पावले. काही म्हातारपणानं मरण पावले. तर काही भुकंपानं जमीनीत गाडले गेले. अशारितीनं डायनॉसोरसारखे अजस्र प्राणी नामशेष झाले.

डायनॉसोरसारखे अजस्र प्राणी नामशेष झाले. आता कोणी म्हणतील की मग वाघ, सिंहाची तर शिकार व्हायची. ते का नाही नष्ट झाले? तर याबद्दलही सांगायचं म्हणजे त्यांची पिल्लं कोणतेच प्राणी खात नसत. कधी कधी कुत्रे, लांडगे, तडसे व कोल्हे खायचे त्यांच्या प्राण्यांना. तेही ते मरण पावल्यावर. जिवंतपणी त्यांच्या शरीराला तोंड लावायचीही शक्यतोवर हिंमतच व्हायची नाही. कारण ते त्या प्राण्यांवरही भारी पडायचे. मग ते प्राणी त्यांच्या वाट्याला कशी जाणार! हं, राजे शिकार करायचे. परंतू ते एखाद्या वेळी. शौकासाठी. तसं शिकार करतांना त्यांनाही भीती होतीच. मात्र आजचा काळ पाहता आजही बरेचसे प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळंच असं वाटतंय की काही दिवसानं हेच प्राणी केवळ कागदावरच दिसतील चित्राच्या स्वरुपात डायनॉसोरसारखे.

अलीकडील काळात प्राणी नामशेष होत आहेत. काल लहानपणी जो चिमण्यांचा चिवचिवाट होता. तो दिसत नाही. कालचा पाहूणे आले असे संकेत देणारा कावळा दिसत नाही. कालचे पावसाळा लागणार अशी सुचना देणारा बेडूक दिसत नाही. कालचा पावसाचा संकेत देणारा चतूर दिसत नाही. काल उंदरांना खाणारे साप दिसत नाहीत. याबद्दल सांगायचं झाल्यास आमच्या लहानपणी जे प्राणी आम्हाला अति प्रमाणात दिसायचे. ते आता दिसत नाही. त्याचं कारण काय? तर ते कारण आहे मानवतस्करी. काहींची मानवतस्करीच झाली. या मानवतस्करीत कावळे, कासव, साप, मांजर व बेडूक यासारखे अनेक प्राणी नष्ट होत चालले आहेत. त्यांच्यामध्ये कावळ्याची तस्करी त्यांच्या शरीरातील विशिष्ट अंगासाठी सापाची कातडीसाठी व विषासाठी नव्हे तर स्वतःच्या शरीराला नशा आणण्यासाठी. बेडकाची खाण्यासाठी व प्रयोगासाठी, कासव व मांजराची गुप्त धनासाठी तस्करी झालेली आहे. आता कोणी म्हणतील की तस्करी साप, बेडूक, मांजर, कावळे वा इतर काही मोजक्याच प्राण्यांची झाली. सर्वच प्राण्यांची नाही झाली ना. मग बाकीचे प्राणी कुठं गेले? तेही तर कमी दिसतात. तर त्याबद्दलही सांगायचं झाल्यास ते मोबाईल रेंजनं व वातावरणाच्या अशुद्धेनं नष्ट होत आहेत.

https://mediavartanews.com/2023/06/13/myths-around-death/

वातावरण…वातावरण एवढं अशुद्ध आहे की इथं माणसालाच श्वास घेता येत नाही. तिथं हे प्राणी आहेत. वातावरणात वाफेतून शुद्ध ऑक्सिजन न जात असल्यानं ओझोन वायूची कमतरता झालेली आहे. त्यातच ओझोनचा थर पातळ झालेला असून त्यातून सुर्याचे अतिनील किरणं थेट पृथ्वीवर पोहोचत आहेत. त्यामुळंच पृथ्वीवर ऊन पुष्कळ असते. त्यातून तापमान वाढत चाललं आहे पृथ्वीतलावरचं. तेच तापमान सहन होत नसल्यानं प्राणी पक्षी मरण पावत आहेत. व्यतिरीक्त पृथ्वीवर आज पाण्याचीही मात्रा कमी असल्यानं काही प्राणी पाण्याअभावी तडफडून मरत आहेत. तसंच काही प्राण्यांवर मोबाईलच्या ध्वनीलहरीचा परिणाम होत असल्यानं त्यानंही मरण पावत आहेत.

प्रजाती नष्ट होत आहेत. त्यांच्यावर परिणाम होत आहे. परिणाम कोण करीत आहे? तर तो परिणाम आपणच करीत आहोत. आपण अति मोठ्या प्रमाणावर मोबाईल वापरतो. ज्याचा परिणाम प्राण्यांच्या जगण्यावर होतो. आपण वातावरण अशुद्ध करतो. ज्याचा परिणाम प्राण्यांच्या स्वास्थावर होतो. आपण प्राणीतस्करी करतो. ज्याचा परिणाम ते प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर होतो. असंच जर आपलं वागणं सुरु राहिलं तर एक दिवस हे सर्व प्राणी नष्ट नाही का होणार? अन् तेच प्राणी नष्ट झाले तर आपण तरी राहू का? याचं उत्तर आपल्याजवळ नाही.

महत्वपुर्ण गोष्ट ही की हे सर्व प्राणी, सृष्टीतील सर्व जीवजंतू, मग ते लहान सुईच्या टोकावर शेकडो बसणारे असोत की मॅन्मायसारखे अजस्र प्राणी असोत. हे सृष्टीतील महत्वाचे घटक आहेत. ते नष्ट होवून चालणार नाही. तेव्हा आपणच त्याच्या संवर्धनात वाढ करावी. त्याचं रक्षण करावं. त्याचं जतन करावं. त्यासाठी आपण त्यांची तस्करी करु नये. सृष्टीला अशुद्ध करु नये. मोबाईलचा कमी वापर करावा. प्लॉस्टीकचा अति वापर टाळावा. म्हणजे झालं. यातूनच वातावरण शुद्ध होईल. पाणीही शुद्ध मिळेल व भरपूर प्रमाणात मिळेल. त्यातूनच प्राणीही नामशेष होणार नाही व त्यांच्यात वाढ होईल हे तेवढंच खरं.