तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे 15 जूनला नागपुरात, बीआरएस कार्यालयाचे उद्घाटन करणार

56

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे 15 जूनला नागपुरात येत आहेत, 15 जूनला नागपुरातील बीआरएस कार्यालयाचे उद्घाटन करणार

त्रिशा राऊत

नागपूर ग्रामीण प्रतिनिधीं

मो 9096817953

नागपुर. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार प्रवेश केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा चांगलाच धसका घेतला.तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा देशपातळीवर विस्तार सुरू आहे. महाराष्ट्रातही चंद्रशेखर राव यांनी पक्ष विस्तारावर भर दिला आहे. आता नागपुरातही के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार. त्यासाठी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे 15 जूनला नागपुरात येत आहेत.

महाराष्ट्रात बीआरएस पक्ष विस्ताराचे कार्य सुरू : तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेडमध्ये पहिली सभा घेऊन महाराष्ट्रात बीआरएस पक्षाची पायाभरणी केली होती. त्यानंतर त्यांनी मध्यंतरी मराठवाड्यात पक्षासाठी जाहीर सभा घेतल्या आहेत. आता तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विदर्भात पक्ष विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. उद्या नागपूर येथे भारत राष्ट्र समिती पक्ष, विदर्भ (BRS) च्या महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री, तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते केले जाणार आहे. नागपुरात होणार कार्यकर्ता मेळावा : यानिमित्त कार्यकर्ता मेळावा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. के चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यानिमित्ताने नागपूर शहरात ठिकठिकाणी “अब की बार किसान सरकार”चा नारा देणारे बॅनर्स लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव नागपुरात येत असल्याने बीआरएसच्या कार्यकर्तांमध्ये उत्साह आहे.

असा असेल के. चंद्रशेखर राव यांचा नागपूर दौरा : गुरुवारी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे नागपूर विमानतळ येथे आगमन व स्वागत होईल. त्यानंतर दुपारी 1.15 वाजता भारत राष्ट्र समिती पक्ष, महाराष्ट्र कार्यालयाचे उद्घाटन होईल. दुपारी 2 वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग येथे कार्यकर्ता मेळावा होणार असून, विदर्भातील विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होईल. त्यानंतर मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सभेला संबोधित करतील. त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.