रायगड मधल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आम्ही सदैव सहकार्य करणार, आमदार भरतशेठ गोगावले यांचे आश्वासन
मीडियावार्ता
१५ जून, महाड: बातम्या ज्या आपल्या ज्ञानात भर घालतील, या ध्येयाने काम करणारी मीडियावार्ता न्यूज हि वृत्तसंस्था पत्रकारितेसोबतच शैक्षणिक उपक्रम, आरोग्य शिबीर यांसारखे समाजपयोगी कार्यक्रम सतत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने राबवत असते. याच उद्देशाने मीडियावार्ताचे संपादक मा. भागूराम सावंत आणि आमचे मार्गदर्शक ग्रुप ग्राम येलावडेचे अध्यक्ष श्री. मंगेश सावंत यांनी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांची सदिच्छा भेट घेतली.
सध्या दहावी, बारावी चे निकाल लागले असून शाळा, महाविद्यालयीन प्रवेशासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरु आहे. अशावेळी कोणता अभ्यासक्रम निवडावा ? त्याचे कॉलेज कुठे आहे ? प्रवेशप्रकिया कशी असते? त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात ? यांसारखे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांनासमोर असतात. हेच प्रश्न सोडविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअर आणि प्रवेश प्रकिया मार्गदर्शन शिबीर सारखे उपक्रम राबवण्याचे मीडियावार्ताचे आयोजन आहे. या उपक्रमांविषयी चर्चा करत असताना मीडियावार्ता टीमला मार्गदशन करत, रायगड मधल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आम्ही सदैव सहकार्य करणार, असे आश्वासन आमदार भरतशेठ गोगावले यांनी दिले.
सदरप्रसंगी मीडियावार्ताचे संपादक मा. भागूराम सावंत, आमचे मार्गदर्शक ग्रुप ग्राम येलावडेचे अध्यक्ष श्री. मंगेश सावंत यासंबरोबर रायगड ब्युरो चीफ सचिन पवार, माणगाव प्रतिनिधी बाळाराम कांबळे, विवेक काटोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली मीडियावार्ता रायगड टीमकडून रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी करिअर आणि प्रवेश प्रकिया मार्गदर्शन शिबीर आयोजनाची तयारी चालू असून येत्या आठवड्यात जिल्ह्यात या उपक्रमास सुरुवात होणार आहे.