पोलीस बांधवाकरिता आणि त्यांच्या कुटूंबियाकरिता “मोफत हेल्थ चेकअप कॅम्प”

गुणवंत कांबळे प्रतिनिधी

बदलापूर:- ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना, भारत आणि मेडलाईफ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समस्त पोलीस बांधवाकरिता आणि त्यांच्या कुटुंबियाकरिता 27 डिसेंबर 2020 रोजी बदलापूर पोलीस स्टेशन, शिवाजी नगर बदलापूर पूर्व दिवसरात्र सेवा करणाऱ्या पोलीसांसाठी मोफत हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आले.

मेडलाईफ फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष भुषण शिरूडे, संचालक डॉ.भुषण शाक्यवीर, हितचिंतक आत्माराम सोनावणे साहेब. तसेच ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.प्रकाश डोंगळे साहेब, राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.धर्मेंद्र अगरवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र अध्यक्ष श्री अनंत हुमने सर, महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री दाजीसाहेब थोरात सर, महाराष्ट्र राज्य सहसचिव श्री विनायक जयकर सर, अंबरनाथ शहर अध्यक्ष श्री संतोष क्षेत्रे सर व पदाधिकारी आणि सदस्य यांच्या उपस्थितीत बदलापूर(पूर्व) पोलीस स्टेशनमध्ये समस्त पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत व मेडलाईफ फाऊंडेशन तर्फे मोफत शिबिर राबवण्यात आले व बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक देशमुख साहेब व कर्मचारी यांनी खूप सहकार्य केले व उदंड प्रतिसाद दिला आणि संघटनेचे खूप खूप कौतुक केले तसेच सर्व सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here