जिल्हा टीबी फोरम समन्वय समिती व जिल्हा टी बी कोमॉर्बिटी समन्वय समितीची बैठक संपन्न…

59

जिल्हा टीबी फोरम समन्वय समिती व जिल्हा टी बी कोमॉर्बिटी समन्वय समितीची बैठक संपन्न…..

✍️मृणाली जाधव

माणगांव तालुका प्रतिनिधी

📞70834 51685

माणगांव :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात (दि.14 जून रोजी) निवासी उपजिल्हाधिकारी श्री.संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समिती व जिल्हा टी बी कोमॉर्बिटी समन्वय समितीची बैठक संपन्न झाली.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील, अति.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, डॉ.सागर काटे, Hwc डॉ.विकास पवार, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण सल्लागार,डॉ.सुरेश ठोकळ, वैद्यकीय अधिकारी, जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्लागार, डॉ.नेहा नलावडे, डॉ.मेजर आश्लेषा तावडे, डॉ. एन. जे. पळवणकर, श्री.जयवंत विशे, आरोग्य पर्यवेक्षक, सौ.रेशमी संकले, विहान ट्रस्ट व आधार ट्रस्टचे प्रतिनिधी सौ.जागृती, सामाजिक विकास ट्रस्टचे प्रतिनिधी, सुरभी संस्था अध्यक्ष सौ.सुप्रिया जेधे, श्री.सुशील साई, समाजसेवक एन.टी.सी पी., श्री.दंतराव सतीश, DPPM, श्री.किर्तिकांत पाटील, STS, श्री.रामनाथ गोल्हार आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटीलर यांनी बैठकीत अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी टीबी मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी चर्चा करण्यात आली. तशा सूचना सर्व ग्रामपंचायतीना भेटी देऊन त्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी माहिती देण्यात यावी, त्यांचे सहकार्य घ्यावेत असे देण्यात निर्देश देण्यात आले. तसेच विशेष करून पनवेलमध्ये कार्पोरेटची संख्या जास्त असल्याने तिथे रुग्णांची, कामगाराची, तपासणी शिबिरे घेण्यात यावीत, असे पनवेल म.न. पा. चे शहर क्षयरोग अधिकारी डॉ.अनिल पाटील यांना सांगण्यात आले.

तसेच निक्षय मित्र पनवेल मध्ये जास्तीत जास्त करावेत. तेथील सर्व सामाजिक संस्था व राजकीय पक्ष व नेते तसेच कार्पोरेटीना भेटी देऊन त्यांना प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियानची माहिती द्यावी. टी बी चा रुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषक आहार वाटप करण्याचे आवाहन करावे. तसेच टी. बी.चे notification वाढिण्याकरिता प्रयत्न करावेत, HIV positive रुग्णांचे, टी बी चे टेस्ट त्यांची नोंदणी नि:क्षय मध्ये करण्याचा सूचना देण्यात आल्या.