जीवनात प्रत्येक वादळात पर्वतासारखा खंबीरपणे उभा रहाणारा बापच…!

56

जीवनात प्रत्येक वादळात पर्वतासारखा  खंबीरपणे उभा रहाणारा बापच…!

रमेश कृष्णराव लांजेवार
मो.नं.९९२१६९०७७९

वडिलांचा मानसन्मान व्हावा या उद्देशाने जगात दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारला पितृदिन (फादर्स डे) साजरा केला जातो.त्या अनुषंगाने यावर्षी पितृदिन (फादर्स डे) १८ जून २०२३ रोज रविवारला येत आहे. त्यामुळे पितृत्व आणि मातृत्व या परीभाषांशी किती जवळच आणि रक्ताच नात असते हे आपल्याला आई-वडील या शब्दावरूनच सहज समजून येते.या जगात माय-बापा शिवाय मोठा कोणीही नाही.आई-वडील,माय-बाप या शब्दाला सुध्दा कुठेही तोड नाही.कारण आई-वडील हा शब्द फक्त मानवजाती पुरताच सीमित नसून संपूर्ण जीवसृष्टी, पशुपक्षी या शब्दाशी निगडित आहे. तेव्हाच आपल्याला उत्पत्ती,संस्कार,संस्कृती सर्वत्र दिसून येते.ज्याप्रमाणे आई-वडील मुलांची जोपासना करते. 

त्याचप्रमाणे पशुपक्षी व संपूर्ण जीवसृष्टी आपल्या पिल्लांची(मुलांची)जोपासना करून लहाण्याचे मोठे करतात.ही ईश्वरी देणच आहे.त्यामुळे या जगात आई-वडीला पेक्षा कोणीही मोठा नाही.कारण वडीलांवर आपल्या मुलांचीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची मोठी जबाबदारी असते.त्यामुळे आर्थिकदृष्ट्या व इतर बाबतीत सुरक्षेची ढाल बनून वडील आपले कार्य तत्परतेने करीत असतो.त्यामुळे आई-वडीलांची भुमिका समान असते. आई नेहमी मायेच पांघरूण घालत असते तर वडील पहाडासारखा संपूर्ण कुटुंबाची रक्षा करून सुरक्षा कवच ची भुमिका निभावत असतो.सर्वांनीच आई-वडीलांचा सेवा व सन्मान करायला हवा.वडीलांचा मानसन्मान करून पितृ दिवस हा तर दररोज साजरा करायला पाहिजे.परंतु जगाला जान रहावी म्हणून ठराविक दिवशी पितृ दिनाला महत्व आहे.पितृ दिन असो किंवा मातृ दिन दोन्ही दिवस एकसमानच असतात.कारण मातृदिनाचा इतिहास १८६० या दशकाशी संबंधित आहे.त्यामुळे सर्वप्रथम मातृदिनाची सुरूवात अमेरिकेतुन  झाली. यानंतर पितृदिनाची मागणी व्हायला लागली.

https://mediavartanews.com/2023/06/03/do-we-really-respect-woman-in-india/

१९०७ मध्ये प्रथमच पितृदिन अनधिकृतपणे साजरा करण्यात आला.यानंतर अधिकृतपणे १९१० ला पितृदिनाला सुरूवात झाली.मात्र पितृदिन साजरा करण्याच्या तारखांमध्ये मतभेद आहेत.मातृत्व दिन(मदर्स डे) प्रमाणेच वडिलांचा आदर सन्मान व्हावा व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृदिन (फादर्स डे) साजरा केला जातो.जगात आई-वडील या शब्दाला सुध्दा तोड नाही.कारण जगातील कोणतीही भाषा असो मामा-मामी, काका -काकु,माऊशी इत्यादी अनेक नाते आहेत व यासाठी वेळोवेळे शब्दप्रयोग सुध्दा आहेत.परंतु जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात जा तुम्हाला आई-वडील यांच्यासाठी एकच शब्द दिसेल.उदाहरण द्यायचे झाले तर आई-बाबा, मम्मी -पप्पा अशाप्रकारे जगात एकच शब्द आपल्याला आई-वडीलांसाठी दिसून येईल ही एक सृष्टीची लिलाच म्हणावी लागेल.

मानवी नातेसंबंध आणि जगातील वेगवेगळ्या नात्यातील एक नातं म्हणजे वडिलांच नात.वडीलांच आणि मुलांचे नाते म्हणजे समुद्रातील पाण्यासारख अफाट असते.कारण प्रत्येक आई मुलांना घडवीते सुसंस्कृत करते पदोपदी मुलांची काळजी घेते यातच मातृत्व दडलेले दिसून येते.कारण आई मुलांच्या सानिध्यात चोवीस तास असते.त्यामुळे आपले मुल काय करीत आहे आणि आपण त्यांच्यासाठी काय केले पाहिजे याची सटीक चाहूल आईला कळते व त्यापध्दतीने मुलांचे संगोपन करीत असते.आई अशी दैवी शक्ती आहे की आकाश पाताळ एक करते परंतु मुलाला कधीच उपाशी ठेवत नाही.आई घरातील सर्वांचे जेवण झाल्यावरच जेवण करीत असते.आई-वडीलांच नातं या भुतलावर अफाट असुन न भूतो न भविष्यती अशाप्रकारचे हे नाते आहे.कारण वडिल भुक-तहान विसरून आपल्या कुटुंबाकरीता राबत असतो व घरग्रहस्ती चालवीतो. म्हणजेच घराला आर्थिक बळ देण्याचे काम वडिल करीत असतात तर वडिलांनी केलेल्या कमाईच्या आधारे घर चालवण्याची मोठी जबाबदारी आईची असते.कारण मोजक्या पैशात आईला घर चालवायचे असते.म्हणजे घरात काय कमी जास्त आहे हे सर्व आईलाच पहावे लागते व ही तीची मोठी कसोटीची परिक्षा असते.

समाजात आईच्या कार्याला तोड नाही व वडिलांच्या कर्तुत्वाला कोणीही मात करू शकत नाही.म्हणुन सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजे की आपले खरे गुरु व  दैवत आई-वडीलच त्यामुळे आजच्या तरुण पिढीने आई-वडीलांना प्रथम स्थानावर ठेवले पाहिजे.आई या शब्दाला किती महत्त्व आहे हे आपण या ओवी वरून समजू शकतो.आई माझा गुरु,आई कल्पतरू सुखाचा सागर आई माझी,प्रीतीचे माहेर, शांतीचे आगर मांगल्याचे सारं आई माझी.म्हणजे आईविना जग नाही व वडीलांविन आधार नाही.आपल्याला थोडीशी जरी इजा किंवा दुर्घटना झाली तर मुलं आईग म्हणून किंचाळतो तेव्हा आईच्या रूपात कोणीना-कोणी अवश्य धावुन येतोच ही दैवी शक्ती आई या शब्दात आपल्याला दिसुन येते.या उलटं वडिलांचे आहे.एखादी मोठी दुर्घटना घडली तर प्रत्येक व्यक्ती बापरे म्हणून जोरांनी ओरडतो अशा वेळी ताबडतोब आजुबाजुला असलेले नागरिक वडिलांची भूमिका बजावतात.म्हणजेच वडील तीथेच नसतांना सुध्दा तेथील संपूर्ण नागरिक वडिलांची भूमिका बजावतात.अशा वेळी आपणही म्हणतो की लोक देवासारखे धावुन आले. म्हणजे आईग आणि बापरे या कठीण शब्दांसामोर सर्वसामान्य माणूस आपल्या आई-वडिलांची भुमिका बजावतात व दैवी रूपाने मदतीला धावून येतात. 

मानवजातीमध्येच ज्याप्रमाणे आईची भूमिका असते त्याचप्रमाणे संपूर्ण पशुपक्षी व जीवसृष्टीमध्ये आईची भूमिका अग्रगण्य असल्याचे आपल्याला दिसून येते.कारण मुलांच्या आयुष्यात नेहमीच ती सुर्याच्या प्रकाशाप्रमाणे वावरत असते जेणेकरून मुलांच्या आयुष्यात कुठेही अंधक्कार पडणार नाही याची काळजी घेत असते.कारण आई आपल्या मुलांसाठी आपल्या जीवाचा आटापिटा करून मुलाला लहाण्याचा मोठा करते.त्यामुळे आज सर्वांचीच प्रथम जबाबदारी आहे की आपल्या आई-वडिलांची सेवा करने,पालनपोषण करणे, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे व त्यांच्या वेदना जाणुन घेऊन त्यांवर उपाययोजना करणे आणि आई-वडीलांना सुखी व समाधानी ठेवणे यातच आपल्याला खरा जागतिक पितृदिन दीसुन येईल.माझ्यामते पितृदिन ठराविक दिवशीच का साजरा करावा.दररोज का साजरा का करू नये? मी तर म्हणेन की मातृत्व-पितृत्व दिवस हा दररोज आई-वडीलांची सेवा करून साजरा केला पाहिजे व आपण ते दिवस आठवायला पाहिजे की आपल्याला लहाण्याचे मोठे करण्यासाठी आईने कीती यातना व दु:ख सहन केले असावे.याची जाणीव आज मुलांनी ठेवण्याची गरज आहे.कारण आईने आपल्याला वटवृक्षाच्या छायेत लहाण्याचे मोठे केले व याच वटवृक्षाचा पहारेकरी म्हणून वडिलांनी आपली चोख भुमिका बजावली.आई-वडीलच्या तत्परतेमुळेच मुलांच्या केसालाही धक्का लागत नाही ही दैवी शक्तीच म्हणावी लागेल.

पितृत्व दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना हेच सांगु इच्छितो की आपण सर्वांनी भारतीय संस्कृतीच जपायला हवी यातुनच आपल्याला खऱ्या अर्थाने आई-वडीलांची सेवा करता येईल.पाश्चिमात्य देशात आई-वडील सोडून इतर नातेसंबंध अंकल व ॲटी या दोन शब्दात संपुष्टात आली आहे.परंतु भारतीय संस्कृतीत आजी, आजोबा,काका, काकु,मामा,मामी, आत्या इत्यादी अनेक  वेगवेगळे शब्द आपल्याला वेगवेगळ्या नात्यांप्रमाणे दिसून येतात त्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे.त्यामुळे अंकल-ॲन्टी हे पाश्चिमात्य शब्द  विसरायला हवे.त्याचबरोबल मम्मी-पप्पा या शब्दांना पुर्णविराम देऊन आई-बाबा असे शब्द ऐकू आले तर भारतीय संस्कृतीचा सन्मानच अवश्य होईल असे मला वाटते.आपण १८ जूनला पितृदिन (फादर्स डे) साजरा करीत असतांना पृथ्वी मातेचाही थोडासा विचार करायला हवा.कारण आज पृथ्वीची जोपासना होत नसल्याने निसर्ग दिवसेंदिवस कोपत आहे.याकरीता जागतिक पितृत्व दिनाचे औचित्य साधून प्रत्येक मुलांनी आई-वडीलांच्या आठवणीत रहावे यासाठी आजच्या दिवशी एकतरी वृक्ष लावले पाहिजे.यामुळे एकाच दिवशी देशासह संपूर्ण जगात लाखोंच्या संख्येने वृक्ष लागवड झाल्याचे आपल्याला दिसून येईल.यामुळे पृथ्वीचे संतुलन स्थिर रहाण्यास मोठी मदत होईल व आई-वडीलांना निसर्गाचा आनंद घेता येईल.