महिलेने पाच महिन्याच्या बाळाला जिवंत पेटवलं.

77

महिलेने पाच महिन्याच्या बाळाला जिवंत पेटवलं.

नरबळी म्हणून ही हत्या करण्यात आली असावी असा कुटुंबीयांना संशय आहे.

मध्यप्रदेश:- महिलेने आपल्या पाच महिन्यांच्या बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुड्डी सिंह गोंड असं या 27 वर्षीय महिलेचं नाव असून सुखर गावात हा प्रकार घडला आहे. महिलेने आग लावून आपल्या बाळाला त्यात फेकून दिलं आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

महिलेची मानसिक स्थिती योग्य नसून तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. आपल्या मुलाची हत्या कधी केली हे आठवत नसल्याचं महिला सांगत आहे अशी माहिती तपास अधिकाऱ्याने दिली आहे. महिलेच्या सासूने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. बाळ सारखं रडत असल्यानेच सुनेने पेटवून देत त्याची हत्या केल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

आरोपी महिलेला तीन मुली असून मुलाच्या जन्मानंतर ती विचित्र वागू लागली होती. मांत्रिकाच्या माध्यमातून तिच्यावर उपाचरही सुरु होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या सर्व प्रकारात मांत्रिकाचा काही हात आहे का याची माहिती पोलीस घेत आहेत. नरबळी म्हणून ही हत्या करण्यात आली असावी असा कुटुंबीयांना संशय आहे.