सत्य जरी कठोर असेल तरी…?
सौ.संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
मो: ७८२१८१६४८५
सत्य जरी कठोर असेल तरी शेवटी तो सत्यच असतो कितीही त्याला कोणी कितीही हरविण्याचा प्रयत्न केले तरी तो कधीही हरत नसतो. म्हणून म्हणतात ना की, शेवटी सत्याचाच विजय होत असतो व नेहमी असत्याची हार होत असते या विषयी सर्वांनाच चांगल्याप्रकारे माहीतच असेल. थोडक्यात विचार करायला गेले तर आज जो जिकडे, तिकडे विशाल असा आकाश पसरलेला दिसत आहे आणि त्याच आकाशात लखलखता सूर्य दररोज निघत दिसत आहे व आपल्या तेजाने दऱ्याखोऱ्यात घनदाट जंगलात तसेच इतर ठिकाणी सारखाच प्रकाश देत असतो पण अचानक एखाद्या वेळी, काही क्षणासाठी त्याच्या सभोवती असे मोठे,मोठे काळे कुट्ट ढग जमा होतात एवढेच नाही तर त्याला ग्रहण सुद्धा लागते पण,सूर्य कधी कायमस्वरूपी लपलेला दिसून येते का. ..?
मग या विषयी आपणच विचार करून बघायला पाहिजे. दिसणारा तो सूर्य सत्य आहे त्याच्या प्रकाशाशिवाय बरेच कामे अडून जातात जर एकदा का तो, स्पष्ट दिसला नाही की,सर्वजण त्याची आठवण काढत असतात हे, खरे आहे मग असत्याची का बरं कोणी आठवण काढत नाही. ..? हा एक मोठा भारी प्रश्न आहे. भलाही सत्य जरी कठोर असेल तरी तो कधीही हरत नाही व त्याचा ज्यांनी स्वीकार केला असेल त्यालाही तो हरू देत नाही. एखाद्या वेळेस काही अडचणी मुळे, प्रसंगामुळे क्षणभरासाठी हरत असेल पण,भलत्याच मार्गाने जात नाही.
https://mediavartanews.com/2023/06/18/woman-empowerment-in-india/
कारण सत्य हा स्वयम् सर्वगुणसंपन्न असतो म्हणून आपणही त्याचे महत्व व महानता जाणून त्याची साथ धरून आपल्या जीवनाचा उद्धार करायला पाहिजे भलाही आपल्या जीवनात कितीही अडी, अडचणी संकटे,चांगले वाईट प्रसंग, परिस्थिती, आपत्ती आली तरी कधीही सत्याची साथ सोडू नये व व्यर्थ गोष्टींच्या मागे लागून असत्याला आपलेसे करून घेऊ नये. माणसाचं जीवन म्हटलं तर.. नुसते सुखच असते असे अजिबात नाही त्यासोबत अनेक गोष्टी जुळून आलेल्या असतात, वेळ आली तर..पदोपदी काटे,ककंर वाटेत पडले असतात त्यांनाही पार करून आपल्याला सामोर जायचे आहे पण, सोबतीला मात्र सत्य धरूनच जो पर्यंत कोणतीही व्यक्ती सत्याला धरून राहते तोपर्यंत सत्य सुद्धा त्याची साथ सोडत नाही. म्हणून आपण फक्त एक दिवसाचा किंवा स्वतः पुरते विचार न करता होऊन गेलेल्या सर्व महाविभूतींच्या विषयी वेळात वेळ काढून विचार करायला पाहिजे कारण त्यांच्या जीवनात सुख नावाची गोष्टच नव्हती काहींच्या जीवनात सुख होते पण, तरीही त्यांनी स्वतः च्या बाबतीत कधीच विचार केले नाही सर्व सुखाचा त्याग करून समाजाच्या विकासासाठी देशाच्या भल्यासाठी , व माणसाच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले अनेक संकटाचा सामना केले पण,क्षणभरासाठी सुद्धा सत्याची साथ सोडले नाही.
म्हणून ते जगी अजरामर होऊन गेले कारण सत्य काय असते त्यांना माहीत होते. आपण सर्वजण त्यांच्या महान कार्याला वंंदन करत असतो ,त्यांचे गुणगान करत असतो पण,त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मात्र चालत नाही त्यांचे विचार आत्मसात करुन आचरणात आणत नाही म्हणून सत्य आपल्याला कळत नाही त्याची ताकद कळत नाही इथे कुठे तरी आपणच मागे आहोत या विषयावर सुद्धा विचार करायला पाहिजे. जोपर्यंत या आकाशात सूर्य, चंद्र, तारे आहेत तोपर्यंत होऊन गेलेल्या सर्व महाविभूती अजरामर राहणार आहेत सारा विश्व त्यांना वंदन करत राहणार आहे मग आपणच विचार करावे सत्यात किती मोठी ताकत असेल. ..? आपल्याला दिसून आले असेल म्हणून आपल्या जीवनाला आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी तयार असले पाहिजे व कितीही संघर्ष करावा लागला तरी क्षणभरासाठी सुद्धा डगमगू जाऊ नये सदैव महाविभूतींचे विचार अंगिकारावे व सत्याचा स्वीकार करून या सुंदर अशा मानवी जीवनाला गती द्यावे. सत्य भलाही कठोर असेल तरी तो, शेवटी सत्यच असतो त्याला कोणीही जिंकू शकत नाही. म्हणून आपणही त्याची साथ धरून जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे नक्कीच एकदिवस जीवन जगण्याचा खरा अर्थ कळेल.