योगा केल्याने होतात ‘हे’ फायदे…

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु. कुरखेडा जि. गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

    आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा एका अर्थाने बघितले तर आजच्या सध्याच्या घडीला प्रत्येकांच्या जीवनात सुख, दु:ख अडी,अडचणी व तणाव असते त्यामुळे कुठेतरी त्यांचा परिणाम हा वेगळ्या प्रकारे होत असतो ह्या धावपळीच्या जगात स्वतः कडे लक्ष द्यायला पुरेसा कोणाकडे वेळ नसतो आणि याच मुळे फायदे कमी पण तोटेच जास्त होताना दिसून येतात हे वास्तव सत्य आहे म्हणून माणूस हार मानून जगत असते एवढेच नाही तर चुकीच्या मार्गाने जाऊन जीवनाची माती करत असते तर कोणी टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे जीवन संपवून टाकतात त्यांना आपण काय म्हणावे…? एका अर्थाने बघायला गेले तर माणसाचं जीवन सर्वात वेगळं आहे निसर्गाची अनमोल देण आहे या विषयी जरा विचार करून बघायला पाहिजेत म्हणून या जीवनाचे महत्व जाणून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. योग केल्याने फायदे अनेक आहेत तसेच माणसाला त्यातून एक प्रकारची वेगळी उर्जा मिळत असते, अंगात नवीन स्फूर्ती निर्माण होते, मन प्रसन्न राहते, आळस नाहिसा होतो ,सर्व काम व्यवस्थितपणे पार पडतात, जेवण सुद्धा नीट चालते आणि मनात चांगले,चांगले विचार येतात एवढेच नाही तर..योगा मुळे आरोग्य सुदृढ निरोगी राहते,दीर्घायुष्य लाभते यासाठी नियमीतपणे योगा करणे काळाची गरज आहे. आपण म्हणत असतो की, आरोग्यम धनसंपदा हीच धनसंपदा टिकवून ठेवण्यासाठी योग करण्याचा सर्वात मोठा फायदा आहे सोबतच त्याच्यामुळे उत्साह निर्माण होतो व आपल्या जीवनाला आधार मिळते.

https://mediavartanews.com/2023/06/02/turtles-information-in-marathi/

       दैनदिन योग केल्याने काही फायदे असतील म्हणूनच आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणून आपणही आपल्या आरोग्यासाठी, शरीरासाठी वेळात वेळ काढून दैनदिन योग करावे. आजपर्यंत बऱ्याच जणाकडून योग केल्याने किती फायदे होतात आपण कदाचित ऐकले असणार यात काही शंका नाही. आपल्याच घरी योग करण्यासाठी कोणाला पैसे द्यावे लागत नाही किंवा योग करते वेळ कोणीही अडवू शकत म्हणून टाळाटाळ करण्यापेक्षा योगाला आत्मसात करावे व त्याच्यातून होणारे फायदे आपण स्वतः जाणून घ्यावे जे,दैनदिन योग करतात ते समाधानी व हसत दिसतात कदाचित हे सर्व योगा केल्यामुळेच होऊ शकते आजची खरंच परिस्थिती बऱ्याच प्रमाणात बदलेली दिसून येत आहे या साऱ्या गोष्टीला ,परिस्थितीला मागे सारून योग करण्याकडे वळावे फायदे आपल्याच होतील दुसऱ्याला नाही. 

      माणसाचं जीवन एकदाच येते त्याला अजून सुंदर बणविण्यासाठी व तंदरुस्त राहण्यासाठी योग हा सर्वात मोठा पर्याय आहे आपणच जाणून घ्यावे. योग हा साधा आणि सर्वात मोठा एक महत्वाचा पर्याय आहे नियमितपणे योग केल्याने हळूहळू त्यातून होणारे फायदे दिसून येतील, आपले दोन पैसे ही वाचतील ,कामे नीट होतील व मनात समाधान वेगळ्या प्रकारचा राहील म्हणून या, साध्या आणि सोप्या मार्गावर चालण्यासाठी मनात आवड ठेवावी व आपल्या जीवनाला अधिक सुंदर बणवावे योग करा आंनदी रहा व इतरांना ही योग करण्याचा सल्ला द्या जीवन अजून सुंदर होईल व जीवन जगण्याचा खरा आनंद मिळेल कारण योगामुळे नुकसान होत नाही तर फायदेच अनेक होत असतात त्याचा स्वीकार करावे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here