चंद्रपुरात राष्ट्रवादीला खिंडार! राष्ट्रीय ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचा लवकरच भाजपात प्रवेश निश्चित 

अश्विन गोडबोले 

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351 

चंद्रपूर, 21 जून: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ नेते डॉ. अशोक जिवतोडे यांनी माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आपण भाजपात प्रवेश करत असल्याचे आज पत्रपरिषदेत घेत जाहीर केले.

डॉ. जिवतोडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असुन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक देखिल आहेत. त्यांनी ओबीसी बांधवांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केली असुन समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी संघर्ष केला आहे. ओबीसी जनगणना व्हावी ह्या मागणीसाठी त्यांनी राज्यातील संपूर्ण वातावरण ढवळून टाकले होते. त्यांच्याच प्रयत्नांमुळे बऱ्याच राजकीय पक्षांनी ओबीसी जनगणनेला पाठिंबा देखिल दिला असुन त्यांचे हे आंदोलन देशव्यापी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

आपण राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असुन ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्याची इच्छाशक्ती तसेच त्यासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता केवळ भाजपात असल्याने आपण देवेंद्र फडणवीस ह्यांच्या नेतृत्वात भाजप प्रवेश करत असुन पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पार पाडणार असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.

डॉ. अशोक जिवतोडे यांनी आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या उपस्थितीत 25 जुन रोजी दुपारी 3:30 वाजता जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here