सामाजिक वनीकरण योजनेत लाखोचा भष्ट्राचार.

प्रशांत जगताप
हिंगणघाट:- महाराष्ट्र राज्यात वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून राज्यात 2018 ते 2019 यावर्षीच्या वनमहोत्सव कालावधीत राज्यात 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. पण आज हिंगणघाट तालूक्यातील लावलेले 80 टक्के वृक्ष पुर्णत नामशेष झाले असल्याचे समोर येत आहे.

महाराष्ट्र शासनाने करोड़ो रुपये खर्च करुन वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यात समाजिक वनीकरण ही योजना कार्यावीत केली. या योजनेच्या माध्यमातून तालूक्यात 2018 ते 2019 या वर्षात रस्त्याच्या दुतर्फा हजारो झाडे लावण्यात आली आणी ती झाडे जगली पाहिजे म्हणून त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आला. पण आज त्यातील 80 टक्के समाजिक वनीकरणाच्या माध्यमातून लावलेली वृक्ष हे नामशेष झाली आहे. किव्हा ती वृक्ष लावली गेली नसल्याचे लोकांचे म्हणने आहे.
जी झाडे आज काही अंशी जिवंत आहे ते पण हिंगणघाट सामाजिक वनीकरण विभागाच्या दुर्लक्षीते व्यवहारामुळे अंतिम घटका मोजत असल्याचे हिंगणघाट तालूक्यातील अनेक गावत दिसुन येत आहे. सामाजिक वनीकरण करुन आपल गाव वृक्षानी समृद्ध करण्याकरिता योजना बरी होती पण तीला भष्ट्राचाराची लागण झाल्यामुळे ती आज मयत अवस्थेत आहे. लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? आज भष्ट्राचाराच निष्काळजी पणामुळे अनेक झाडे मरत आहे. त्यांना पाणी मिळत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here