शाहूजींचे विचार आत्मसात केल्याने भविष्य उज्वल : डॉ राहुल जोशी
शाहुंचे आदर्श जोपसणारी ऋणानुबंध संस्था: हि.रा. गवई
✍️मनोज एल खोब्रागडे
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मो: 8208166961
चिखली :- करवीर नरेश आरक्षणाचे जनक छत्रपती शाहुजी महाराज याच्या जयंती व स्वाभिमान दीनाlनिमित्त ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम च्या वतीने भोकर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले या कार्यक्रम चे अध्यक्ष काँग्रेस नेते संतोष कऱ्हाडे, तर प्रमुख मार्गदर्शक साहित्यिक लेखक कवि हि. रा. गवई सर, विशेष उपस्थिती नेत्र रोगतज्ञ डॉ राहुल जोशी, ग्रामीण रुग्णालय चिखली चे आरोग्य अधिकारी डॉ निलेश गायकवाड, शेळगाव आटोळं पी एस सी चे आरोग्य अधिकारी सुमित जेऊघाले, डॉ निलेश सांगळे तर प्रमुख उपस्थितीत विशाल भगत, विशाल इंगळे, विजय डुकरे, सीमा सिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते भाई दिपक अवसरमोल हे होते.
यावेळी तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धा सह गावातील शेकडो गरजू लाभार्थी नि लाभ घेतला. फुले शाहू आंबेडकर यांचे विचार मी आत्मसात केले म्हणून मी डॉक्टर झालो व आज गोर गरीब जनते ची सेवा करीत आहे. आर्थिक अडचणी मुळे कोणताही रुग्ण माझ्याकडून निराश होऊन गेला नाही. म्हणून माझे जीवन आज उज्वल आहे.असे मत डॉ राहुल जोशी यांनी व्यक्त केले.तसेच ऋणानुबंध संस्था ही बहुजन महापुरुष यांच्या विचाराचे प्रचार प्रसार करीत गोर गरीब जनतेला होईल त्या प्रमाणे यथा शक्य मदत करून समजपुढे आदर्श निर्माण करीत आहे असे मत हिरा गवई यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम चे सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे, प्रास्ताविक मनोहर डोंगरदिवे, तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ डोंगरदिवे यांनी केले. यावेळी तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धासह भोकर येथील शेकडो रुग्णांची मोफत तपासणी करून औषध उपचार करण्यात आले. यावेळी राजू डोंगरदिवे, श्याम डोंगरदिवे, विनोद डोंगरदिवे, समाधान डोंगरदिवे, प्रकाश डोंगरदिवे, विलास डोंगरदिवे, संदेश डोंगरदिवे, उत्तम महाराज डोंगरदिवे, भास्कर डोंगरदिवे यांच्या सह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.