लोहिया विद्यालयात भगवान श्रीदत्त जयंती व स्व.रामेश्वरदासजी लोहिया पुण्यतिथी संपन्न.

67

लोहिया विद्यालयात भगवान श्रीदत्त जयंती व स्व.रामेश्वरदासजी लोहिया पुण्यतिथी संपन्न.

सौन्दड:- लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा व लोहिया कॉन्व्हेंट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल,सौंदड येथे दि.29 डिसेंबर,2020 रोज मंगळवारला भगवान श्रीदत्त जयंती व स्व.रामेश्वरदासजी लोहिया यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी मा.अतिथींनी भगवान श्रीदत्त व स्व.रामेश्वरदासजी लोहिया यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा. जगदीश लोहिया-संस्थापक/ संस्थाध्यक्ष – लोहिया शिक्षण संस्था, सौन्दड, प्रमुख अतिथी म्हणून मा.आनंदराव घाटबांधे-संस्था उपाध्यक्ष,मा.पंकज लोहिया-संस्था सदस्य,मा.डॉ.संकेत परशुरामकर, मा.प्रल्हाद कोरे,मा.पुरुषोत्तम लांजेवार,मा.बाबुराव हरणे,मा.गुलाब शहारे,मा.प्रभू इटवले,मा.रामचंद्र भेंडारकर,मा.अनिल मेश्राम सर,मा.दिलीप शहारे,मा.महादेव लाडे विद्यालयाचे प्राचार्य मा.मधुसूदन अग्रवाल ,मा.गुलाबाचंद चिखलोंढे, मुख्याध्यापक मा.मनोज शिंदे व पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे उपस्थित होते.

गोंदिया जिल्ह्यातील नामवंत तसेच राज्यस्तरावर विविध स्पर्धांमध्ये मजल मारलेल्या सौन्दड येथील रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक(कला व विज्ञान)लोहिया ज्यांच्या नावाने सुरू आहे असे स्व.रामेश्वरदास जमनादास लोहिया यांनी विविध माध्यमातून समाजकार्य केले आहे.तसेच कुटुंबाला सुद्धा योग्य दिशा दिली. स्व.रामेश्वरदासजी व स्व.जमुनादेवी लोहिया यांच्या प्रेरणेतून संस्थापक- अध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांनी सौन्दड व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी रामदेवबाबा अध्यापक विद्यालय,जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा तसेच लोहिया कॉन्व्हेंट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल,सौन्दड आदी विद्यालयांची स्थापना करून संचालन करीत आहेत. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यानी अनेक क्षेत्रात यशाची मजल मारली आहे. स्व.रामेश्वरदासजी लोहिया यांनी गावाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याबरोबर विकासासाठी देखील अमूल्य योगदान दिले आहे.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जगदीश लोहिया ,संस्थापक -संस्थाध्यक्ष यांनी ” कठोर परिश्रम व संस्कार हीच यशाची गुरुकिल्ली आहे” असे मोलाचे मार्गदर्शन केले. प्राचार्य मा.मधुसूदन अग्रवाल, मा.गुलाबचंद चिखलोंढे ,पर्यवेक्षिका सौ.कल्पना काळे ,सहाय्यक शिक्षक श्री.दरवडे व श्री.सातकर यांनी सुद्धा भगवान श्रीदत्त यांच्या जीवन महिमेचे महत्व व स्व.रामेश्वरदासजी लोहिया यांचे समाजपयोगी कार्य व संस्कार याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली व सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा गीत व भाषणातून श्रीदत्त व स्व.रामेश्वरदासजी लोहिया यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमात कोविड-19 च्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले.कार्यक्रमाला संस्थेशी संबंधित समित्यांचे पदाधिकारी व सदस्यागण ,विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका कु.यु.बी.डोये यांनी केले तर आभार स. शि.श्री.मोहतुरे यांनी मानले. ‘वंदेमातरम’या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.