आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिवस संपन्न
नागपूर : – अर्पण बहुद्देशीय संस्था नागपूर व्दारा संचालित रिलीफ व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्रामध्ये दिनांक 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोध दिवस साजरा करण्यात आला.आजच्या स्पर्धेच्या युगात देशाचे भविष्य घडविणारा तरूण अंमली पदार्थांच्या व व्यसनाच्या आदिन जात आहे यामुळे वाईट सवयी लागतात.अशा परिस्थितीत युवकांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते आणि याचा परिणाम संपूर्ण परिवाराला भोगावा लागतो व भविष्य धोक्यात येते.त्याचप्रमाणे कोणतीही नशा असो ती शरीराला घातकच असते.आज जगाचा विचार केला तर 40 टक्के युवक नशेच्या आदिन असल्याचे सांगितले जाते ही अत्यंत चिंतेची बाब आहे.नशा व व्यसनापासून मुक्तता कशी मिळविता येईल व व्यसनमुक्त समाज कसा निर्माण केला जाऊ शकतो.यावर अनेक मान्यवरांनी आपले प्रखर विचार प्रगट केले.यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षा काळे मॅडम (सहाय्यक पोलिस निरीक्षक, नंदनवन), श्री पाचोरे सर(पोलिस उपनिरीक्षक, नंदनवन), रमेश लांजेवार (स्वतंत्र पत्रकार),सौ.नंदा आदमने(रिलीफ व्यसनमुक्ती केंद्राचे सचिन), श्री रमेश आदमने (कोषाध्यक्ष), अशोक तिडके, प्रशांत तिडके इत्यादीसह अनेक मान्यवरांनी आपले विचार प्रगट केले.कार्यक्रमाच्या शेवटी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवसाच्या अनुषंगाने सर्व मंडळींनी तसेच रूग्णांनी कधीही व्यसन न करण्याची एकत्रित शपथ घेतली.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(स्वतंत्र पत्रकार)
मो.नं.9921690779, नागपूर.