जॉय ऑफ गिविंग तर्फे विद्यार्थ्यांना किराणा व शैक्षणिक सामान वितरित
मुंबई – गणेश हिरवे
मुंबई : – जॉय ऑफ गिविंग मुबई या सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच जव्हार येथील निलेश मुरडेश्वर कर्णबधीर शाळेतील ६५ मुलांना किराणा सामान ( तूरडाळ तांदूळ गहू रवा पोहे मूग मटकी फरसाण कोलगेट साबण मुगडाळ मसुरडाळ, बॅग रायटींग पॅड, वह्या,रायटींग किट) आदी वस्तूंचे जूनपासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात म्हणून वाटप करण्यात आहे.विविध आश्रमशाळा, अनाथालय, वृद्धाश्रम व जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे मदत पोहचिण्याचा जॉयचे सभासद प्रयत्न करीत असतात.जॉय संस्थेचे कार्य लक्षवेधी असून अनेक मान्यवर व समजतील संवेदनशील व्यक्तींनी आमच्या संस्थेला वेळोवेळी सहकार्य केल्याचे अध्यक्ष गणेश हिरवे यांनी सांगितले.यावेळी असूंता डिसोझा व वैभव पाटील यानी मुलांना मार्गदर्शन केले.