ग्रुपग्रामपंचायत बामणोली सरपंचावर ७ सद्यस्थानी टाकला अविश्वास बहिष्कार
बामणोली सद्यस्थानी माणगांव तहसीलदार विकास गरुडकर यांना दिले निवेदन….
✍️सचिन पवार ✍️
रायगड ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-माणगांव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बामणोली गावच्या सरपंच स्नेहा नथुराम खाडे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव ग्रामपंचायत सद्यस्त मंगेश काळू पवार (उपसरपंच ), सुवर्णा राजेंद्र सकपाल सद्यस्त , साक्षी सुनिल दळवी सद्यस्त , उज्वला शैलेश पाखुर्डे सद्यस्त , स्वाती संदेश पाखुर्डे सद्यस्त,रंजना संतोष कोळी सद्यस्त आणि सुशांत बाळाराम पडवळ सद्यस्त तसेच माजी सरपंच बाबू पाखुर्डे, प्रवीण पाखुर्डे, राजेंद्र सकपाल,विजय पडवळ, शैलेश पाखुर्डे व सर्व ग्रामस्थांनी स्नेहा खाडे सरपंचावर अविश्वास बहिष्कार टाकला असून माणगांव तहसीलदार विकास गरुडकर यांना आज दि.२८ जून रोजी निवेदन पत्र देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत बामणोलीच्या सरपंच स्नेहा नथुराम खाडे यांच्या कडून प्रत्येक कामात स्वतःचा मनमानी कारभार चाललेला आहे तसेच कोणत्याही सद्यस्याला विश्वासात घेत नाही सरपंच स्नेहा खाडे या ग्रामपंचायतिच्या विकास कामामध्ये अडथळा निर्माण करीत असतात अशा या आताच्या वस्तुस्थितीमध्ये तीन गावाचा विकास अनिवार्य आहे असं ग्रामस्थांकडून तसेच सात सद्यस्याकडून एकण्यात येत आहे. अशा या सरपंचाचा आम्ही जाहीर निषेध करून आम्ही त्याच्या विरोधात अविश्वास बहिष्कार टाकीत आहोत असे ग्रुप ग्रामपंचायत बामणोली चे सात सद्यस्थ्य बोलत होते.