महाड तालुक्यातील दहिवड येथे उंदराचे औषध पिऊन एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या
✍️राकेश देशमुख ✍️
महाड तालुका प्रतिनिधी
📞 788 787 9444 📞
महाड :-रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात मौजे दहिवड या गावातील एका अल्पवयीन मुलाने उंदीर मारण्याचा औषध घेऊन केली आत्महत्या दिनांक 28 जुन 2023 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी श्री धोंडू लखु कोरपड यानी एमआयडीसी पोलीसाना दिलेल्या खबरेनुसार मुकाम दहिवड, देउळमाळ, ता.महाड जि.रायगड येथे मयत लक्ष्मण धोंडू कोरपड वय वर्ष 14 यांच्या कुटूंबातील मागील काही पाच वर्षांपूर्वी त्याची आई कपडे धुण्यासाठी गेली असता पाण्यात बुडून मरण पावली होती ,त्यानंतर 3 वर्षापुर्वी त्याचा मोठा भाऊ आंघोळीकरता गेला असता पाण्यात बुडून मरण पावला तसेच दुसरा भाऊ हा दिनांक 20 मे 2023 रोजी उंदीर मारण्याचे विषारी औषध घेऊन मरण पावला अशा या नैराश्यातून मयत लक्ष्मण याने दिनांक 27 जुन 2023 रोजी सकाळी उंदीर मारण्याचे विषारी औषध घेतले होते.
त्यानंतर त्याला औषध उपचाराकरिता महाड येथील दस्तुरी नाका न्यु लाईफ मल्टि स्पेशालिस्ट हाॅसपिटल येथे अँडमिट केले असता त्याच्यावर औषध उपचार सुरु असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या घटनेची खबर महाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात समजतात महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. आंधळे यांनी घटनास्थळास भेट देऊन महाड एमआयडीसी सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. गायकवाड व सहायक फौजदार ढेपे हे करीत आहेत.