आषाढी एकादशी तसेच बकरी ईद निमित्त लोणी काळभोर येथे वृक्षारोपण
✍️संजय महाजन✍️
शिर्डी तालुका प्रतिनिधी
8308964268
शिर्डी : – लोणी काळभोर- तीर्थक्षेत्र रामदरा
महादेव मंदिर डोंगर परिसर या ठिकाणी ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त वड,करंज, अर्जुन, कडुनिंब, पिंपळ अशा प्रकारची जंगली वृक्ष ग्रीन फाउंडेशन सदस्य दिपक चव्हाण सरदार यांच्या शुभहस्ते लावण्यात आली. या वेळी बाबासाहेब यादव, दिपक चव्हाण, ग्रीन फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, अथर्व यादव, शेवाळेताई उपस्थित होते.
आषाढी एकादशी हा वारकरी सांप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे अशी महिती ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी दिली.