आजीला बोलावण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलून घरात कोंडलं

आजीला बोलावण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलून घरात कोंडलं

आजीला बोलावण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलून घरात कोंडलं

आजीला बोलावण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलून घरात कोंडलं

त्रिशा राऊत नागपूर ग्रामीण प्रतिनिधी मो 9096817953

नागपूर (भिवापूर) : आजीला बोलावण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थिनीला रस्त्यावरून उचलून घरात कोंडलं आणि मग नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना भिवापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलगी कशीतरी पळून जाण्यात यशस्वी झाली. आणि तिने तिच्या पालकांना घटनेची माहिती दिली. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली. सागर जनार्दन राऊत (वय २२) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी माहिती मिळाली आहे. पीडित मुलगी बारावीत शिकते. तिचे आई-वडील शेतमजूर आहेत. आरोपी सागर राऊतची तिच्यावर वाईट नजर होती. तो नेहमी तिच्या मागे लागायचा आणि जातीवाचक अपशब्द वापरत असे. तिने एकदा आई-वडिलांकडे तो त्रास देत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तरुणाला समजावून सांगण्यात आले. मात्र समजून घेण्याऐवजी तो तरुणीला अधिक त्रास देऊ लागला.
ये-जा करत असताना तो तरुणीला चिडवायचा. तिच्या कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ उभा असायचा. अनेकदा तो तिला वाटेत अडवून संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असे. पण न घाबरता तिने त्याला वारंवार नकार दिला. संतापलेल्या नराधमाने तिच्यावर बलात्कार करण्याची धमकीही दिली.
ग्रामीण पोलिसांच्या वायरलेस विभागात अधिकारी दारू पिऊन ड्युटीवर; पोलीस कर्मचाऱ्यासोबत अरेरावी

२६ जूनला दुपारी बारा वाजता ही मुलगी आजीला बोलावण्यासाठी शेजारी जात होती. त्यावेळी सागरने तिला वाटेवरून उचलून त्याच्या घरी नेले. आणि तिला घरात कोंडून ठेवले. तसेच तिच्यावर अत्याचार केला. मात्र, मुलीने खिडकीतून उडी मारून पळ काढला. या घटनेची माहिती तिने आपल्या पालकांना दिली. यानंतर सर्वांनी भिवापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून नराधम सागर राऊत याला अटक केली आहे.