विद्यार्थ्यांच्या हितासाठी बसच्या समस्या तातडीने सोडवा : आमदार सुभाष धोटेंच्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना. मानव विकास कार्यक्रमांतर्गत राजुरा पंचायत समितीची आढावा सभा संपन्न

विद्यार्थ्यांच्या हितासाठी बसच्या समस्या तातडीने सोडवा : आमदार सुभाष धोटेंच्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना. मानव विकास कार्यक्रमांतर्गत राजुरा पंचायत समितीची आढावा सभा संपन्न

विद्यार्थ्यांच्या हितासाठी बसच्या समस्या तातडीने सोडवा : आमदार सुभाष धोटेंच्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना.

मानव विकास कार्यक्रमांतर्गत राजुरा पंचायत समितीची आढावा सभा संपन्न

विद्यार्थ्यांच्या हितासाठी बसच्या समस्या तातडीने सोडवा : आमदार सुभाष धोटेंच्या राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना. मानव विकास कार्यक्रमांतर्गत राजुरा पंचायत समितीची आढावा सभा संपन्न

✍️शुद्धोधन निरंजने✍️
राजुरा तालुका प्रतिनिधी
9921115235

राजुरा (ता.प्र) :– राजुरा पंचायत समितीची मानव विकास कार्यक्रमांतर्गत आढावा सभा गट साधन केंद्र राजुरा येथे सकाळी १०:३० वाजता आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी शिक्षण अधिकारी जिवती, शिक्षण अधिकारी कोरपना, शिक्षण अधिकारी राजुरा आणि आगार व्यवस्थापक, राज्य परिवहन मंडळ आगार राजुरा तसेच कोरपना, जिवती, राजुरा येथील विविध शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षक यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा आगाराच्या व्यवस्थापाकडून संबंधित बस व्यवस्थापनाची सविस्तर माहिती घेऊन त्यावर दुर्गम भागातील बसेसच्या नियोजनासंबंधीची माहिती जानून घेतली. राजुरा, कोरपना तसेच जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्याच्या अडचणी लक्षात घेता शालेय विद्यार्थ्यासाठी बसेसची योग्य वेळेवर व्यवस्था करणे, दुर्गम भागातील विध्यार्थी हितासाठी तसेच इतर प्रवासी यांच्या सुविधेकरिता अतिरिक्त बसची व्यवस्था करणे, शाळेच्या वेळेवर व सुटल्यावर राज्य परिवहन महामंडळ मानव मिशनच्या बसेस नियमित सुरु ठेवणेबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.