पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप, अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे किती आमदार? कुठले नेते फुटले?

जितेंद्र कोळी

पारोळा तालुका प्रतिनिधी

मो: 9284342632

मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार वेगळी चूल मांडणार असल्याची बातमी आहे.

अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार अशी माहिती आहे. अजित पवार यांच्यासोबत 30 आमदार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे एकूण 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात एकूण 54 आमदार आहेत. त्यातल्या 30 ते 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. अजित पवारांसोबत, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे ,आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे  कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी सूत्रांची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here