कोळसा खाणीत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून कामगाराचा मृत्यू
कर्नाटक एम्प्टा खाणीतील घटना
🖋️ अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📱 8830857351
चंद्रपूर : 2 जुलै : – कोळसा खाणीत ओवरबर्डनच्या मातीत दबून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना कर्नाटका एम्टा खाणीत घडली. मृतक हा कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत ठेकेदारी मध्ये काम करत होता. ही घटना रविवारी 2 जुलै रोजी रात्री १:३० च्या सुमारास घडली. विनोद बर्डे (वय ४०) असे मृत कामगाराचे नाव आहे. दरम्यान त्याचा मृतदेह दुपारी कामगारांच्या हाती लागला असून डंपर चालकाच्या चुकीने हा अपघात घडला असल्याची माहिती आहे.
कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत ठेकेदारी मध्ये काम करणाऱ्या विनोद बर्डे याची रात्र पाळी होती. माती टाकण्याचे काम सुरू असताना त्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे डंपर चालकाला डम्पिंग चा अंदाज आला नाही आणि डंपर चालकाने विनोद बोर्डे याच्या अंगावर माती टाकली. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
आज कामगारांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मातीत दबलेल्या विनोदचा मृतदेह काढण्यात आला. कर्नाटक एम्प्टा कोळसा खाण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याने कामगाराच्या आप्तांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी कामगारांनी केली. कंपनीच्या परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण होते. खाणीच्या अधिकाऱ्यांनी मृतकाच्या नातेवाईकाला 20 लाख रुपये व नोकरी देण्याचा करार यावेळी केला.