नागपूर सहायक कामगार आयुक्ताला 60 हजाराची लाच घेताना अटक.

54

नागपूर सहायक कामगार आयुक्ताला 60 हजाराची लाच घेताना अटक.

नागपूर सहायक कामगार आयुक्ताला चक्क 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन (सीबीआय) ने रंगेहात अटक केली. सचिन जे. शेलार असे लाचखोर अधिका-याचे नाव  आहे.

युवराज मेश्राम

नागपूर:- सीबीआयची कारवाई सहायक कामगार आयुक्ताला चक्क 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन (सीबीआय) ने रंगेहात अटक केली. सचिन जे. शेलार असे लाचखोर अधिका-याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेची बोगी दुरुस्त करणा-या कंपनीच्या अधिका-याकडून शेलार याने लाच मागितल्याची माहिती पुढे आली आहे. मेसर्स प्रेमको रेल इंजीनियर्स लिमिटेड कंपनीतील उपप्रकल्प अभियंताच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. प्राप्त महितनुसार, या कंपनीला बडनेरा येथील रेल्वे वैगन सुधारण्याचे कंत्राट मिळाले होते. विभागीय श्रम आयुक्त टी.के. सिंह आणि सहायक आयुक्त शेलारने बडनेरा येथील वकंशॉपचा १३ डिसेंबरला आढावा घेतला होता. कर्मचा-यांची पुरेशी सुरक्षा व्यवस्था न केल्याचा ठपका ठेवत कंपनीच्या अधिका-याला कागदपत्रासह कार्यालयात येण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, तक्रारकर्ते हे 16 डिसेंबर रोजी सेमिनरी हिल्स येथील सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या श्रम आयुक्त कार्यालयात पोहोचले. तेथे टि.के. सिंह यांना भेटले. त्यांनी शेलार यांना भेटून बोलण्यास सांगितले. बराच वेळ होऊनही शेलार यांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिली नाही. त्यानंतर सायंकाळी सिंह यांनी तक्रारकत्र्यांना फोन केला. फोनवर शेलार यांना भेटण्यास सांगितले. शेलारने भेटण्यासाठी घरी बोलाविले. प्रकरण निवडण्याकरीता पैशाची मागणी करण्यासाठी त्यांना त्रास देत असल्याची त्यांना शंका आली. त्यांनी सीबीआयला याची तक्रार दिली. सीबीआयला चौकशीत शेलारने 60 हजार रुपयाची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. शेलारने तक्रारकंत्र्याला मंगळवारी कार्यालयात भेटण्यासाठी बोलाविले. सीबीआयने सापळा रचला. शेलारने स्वीकारताच सीबीआयने त्याला अटक केली. त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयने त्याच्या घराची आणि कार्यालयाची सुद्धा झडती घेतली. तक्रारकत्र्याने सिंह यांचे सुद्धा नाव घेतले आहे. त्यामुळे याप्रकरणात आणखी किती मोठे अधिकारी सहभागी आहेत, याबाबत पुढी तपास सुरू आहे.