पावसाने दिला दगा; अडधळातही पाऊस पडेना
पावसाअभावी पेरण्या रखडल्या
शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट
✍🏽 शुध्दोधन निरंजने✍🏽
राजूला तालुका प्रतिनिधी
📱9921115235
राजुरा : 3 जुलै : – यंदा हत्ती या वाहनावर सवार होऊन पावसाच्या मृग नक्षत्रातली सुरुवात झाली खरी. अगोदर काहीसा थोड्या प्रमाणात पाऊस पडला पण मृग नक्षत्रात एकदाही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडला नाही. मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडा गेला. मृग नक्षत्राने दगा दिल्यामुळे पावसा अभावी तालुक्यातील शेतकर्यांच्या पेरण्या रखडल्या. गेल्या 22 जून ला आद्रा नक्षत्राची सुरूवात झाली. तेव्हापासून काही ठिकाणी सुमारे एक आठवडा काही भागात रिमझिम पाऊस पडला व वातावरण ही ढगाळ होते, त्यामुळे दमदार पाऊस होईल असे शेतकर्यांना वाटत होते. परंतु मागील पाच सहा दिवसांपासून वातावरणात बदल होऊन वातावरण कोरडे व तापमान वाढ आहे. आद्रा नक्षत्राला सुरूवात होऊन बारा दिवसांचा कालावधी लोटून सुध्दा तालुक्यात दमदार पावसाचे आगमन झाले नाही. मृग नक्षत्राने तर दगा दिलाच, परंतु आद्रा नक्षत्रात तरी पाऊस पडेल की नाही. या चिंतेचे सावट शेतकर्यांच्या चेहऱ्यावर सतत दिसत आहेत. आद्रा नक्षत्राच्या सुरुवातीला पाच सहा दिवसात रिमझिम पाऊस पडल्याने तालुक्यातील बहुतांश शेतकर्यांनी कापसाची लागवड केली.
• दुबार पेरणीचे संकट ओढण्याची शक्यता
येणाऱ्या दोन तीन दिवसांत पावसाची दमदार सुरुवात झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोर जावे लागणार असल्याची चिंता तालुक्यातील शेतकरी वर्गाला सतावत आहे. शेतात दोन तीन पानावर आलेले कापसाचे पीक जगवायला पावसाची अत्यंत गरज आहे. सध्या कापसाच्या पिकांत डवरणीचे काम करण्यात शेतकरी व्यस्त आहेत.