गुरूची महिमा अपरंपार…!

65

गुरूची महिमा अपरंपार…!

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु. कुरखेडा जि. गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

          आज गुरूपोर्णीमा आहे त्याच गुरू पोर्णिमेला व्यास पूजा सुध्दा म्हणतात. या पृथ्वीतलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाचे पहिले व आद्य गुरू आईबाबा असतात, नंतर शाळेत शिक्षण देणारे शिक्षक गुरू असतात, ज्यामधून वाचनाने आपल्याला ज्ञान मिळते ती पुस्तक आपली गुरू आहे, आम्हा सर्वासाठी व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले तसेच समाजाच्या हितासाठी, विकासासाठी मोलाचे मार्गदर्शन, संदेश दिले ते थोर संत, महात्मे, महापुरुष, युगपुरुष, समाजसुधारक, महामानव, क्रांतिवीर, देशभक्त आपले गुरू आहेत, आपल्या अफाट कष्टाने जगाला पोसणारा पोशिंदा आपला गुरू आहे, सीमेवर रात्रंदिवस लढा देणारे वीर जवान आपले गुरू आहेत, जे,स्वतः दु:खी असताना सुद्धा नि:स्वार्थ भावनेने दुसऱ्यांची मदत करतात तसे व्यक्तीमत्व आपले गुरू आहेत, या पृथ्वीतलावर असलेले हिरवेगार झाडे, वेल्या, फुले,पशू, पक्षी पाणी तसेच अनेक वस्तू आहेत ते गुरू आहेत. कारण जेवढे हे गुरू होऊन गेले व काही आज आहेत ते महान आहेत कारण त्याच्यात माणुसकी जिवंत होती म्हणून ते अजरामर झाले त्या सर्व गुरूंना कोटी, कोटी वंदन आणि आज आपण त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत असतो एवढी महानता त्या गुरू मध्ये होती. 

      आज सारा विश्व आपल्या गुरूला वंदन करत आहे कारण ते गुरूची महिमा चांगल्याप्रकारे जाणून आहेत तसेच होऊन गेलेल्या महा विभूंतीनी सुध्दा आपल्या गुरूचा सदैव आदर केले आहेत व त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत जगाचे कल्याण केले आहेत म्हणून गुरू हा सर्वात श्रेष्ठ असतो असेही बरेचदा ऐकण्यात आले आहे. म्हणून गुरूसाठी एक श्लोक म्हटल्या जाते *”गुरुर ब्रह्म,गुरूर विष्णू, गुरूर देवो महेश्वरा, गुरूर साक्षात परब्रम्ह तस्मे श्री गुरवे नमः”* गुरू आणि शिष्यातील नाते आईचे तसे लेकराचे असतात म्हणून कधी,कधी लेकरू रडला की,आईला कळत असते किंवा तो चुकला असेल तर ती क्षणासाठी रागावते खरी पण समजावून सांगत असते कारण आई ही नि:स्वार्थी, प्रेमळ, दयाळू असते तसेच गुरू सुद्धा असतात आपल्या शिष्यांना चांगली शिकवण देत असतात व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद देतात म्हणून असे काही गुरू होऊन गेले आहेत व आजही काही गुरू आहेत की,त्यांचे शिष्य मोठ्या पदावर असून सुद्धा गुरूला न विसरता दहा लोकात असतांनाही वाकून नमस्कार करतात ही गुरूनी दिलेले संस्कार आणि शिकवण असते ते शिष्याला कायम आठवणीत ठेवत असते म्हणून ते आपल्या गुरूला सदैव आठवण करत असतात. गुरूची वाणी, निर्मळ भाव, शुध्द कर्म, आचरण, चांगले विचार, नि:स्वार्थ भावना, दया, क्षमा, शांती हे सर्व गुण गुरूत असतात त्यामुळे शिष्य घडत असतो. पण कधी,कधी असं होतं की, गुरू चांगल्या प्रकारे शिकवण देऊन सुद्धा कधी काळी असं होतं की प्रत्येकांच्या जीवनात चांगली वाईट परिस्थिती येत असते तसच एकादा शिष्य त्या परिस्थितीत अडकून पडलेला असतो त्या वेळी शिष्याकडे व गुरूकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन क्षणातच बदलून जाते त्यांना खरच काय म्हणावे …? चांगले करणाऱ्यांलाच लोक बोलत असतात वाईट झाले तर..खळखळून हसतात हेही सत्य आहे. पण,गुरू मात्र आपल्या शिष्यावर हसत नाही तर सदैव त्याच्या भल्याचेच विचार करत असतो. 

      गुरूची महिमा अगाध आहे ज्ञानाचा सागर आहे गुरू शिवाय ज्ञान नाही आणि मोक्ष मिळत नाही असे कोणी म्हणतात कदाचित असावेत. पण,याच पृथ्वीतलावर असे अनेक गुरू आहेत जे कोणी बोलू शकत नाही पण,प्राणवायू फुकटात देत असतात, शीतल सावली देत असतात आपण मात्र कडक उन्हात राहतात त्याही झाडांना गुरू मानावे कारण ते त्यागी असतात. म्हणून ह्या सर्वच गुरूंची महिमा जाणून त्यांचा आदर करावे व त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत जीवनाचे सार्थक करावे शिष्य कितीही मोठा झाला तरीही गुरूची बरोबरी करू शकत नाही. कारण गुरूची महिमा अपरंपार आहे सदैव सत्याच्या वाटेवर चालण्याचा सल्ला देत असते तोच सल्ला आपल्याला गती देत असतो.