शेतकरी चिंतातूर झाले आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट येईल
त्रिशा राऊत
नागपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो: 9096817953
नांद परिसरातील पेरणी १०० टक्के पूर्ण झाली असून गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे. येत्या दोन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.नांद परिसरात रोहिणी व मृग नक्षत्र कोरडेच गेले. आद्रा नक्षत्राचा पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने बळीराजा खरिपाच्या हंगामाकरिता जोमाने भिडला. सोयाबीन पेरणी व कापूस लागवड,हळद लागवड,धानाची पऱ्हे टाकणे सुरूवात केली.
त्यानंतर अधूनमधून हलका पाऊस येत असताना शेतकऱ्यांनी आपली शेती सोयाबीन पेरणी,तूर ,हळद व कापूस लागवड ही १०० टक्के केली. शेतकरी करीत आहे.आता पावसाने ८ ते १० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. शेतात टाकलेली बियाणे उगवले. मात्र पावसाअभावी ते करपण्याच्या मार्गावर आहेत.पेरणी,लागवड चांगली झाली. हवामान खात्याचा अंदाज चुकत असून हवामान शास्त्रज्ञाला सुद्धा पाऊस हुलकावणी देत आहे.
दोन-तीन दिवसांत पाऊस पडला नाही, तर संपूर्ण पेरणीच वाया जाण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे, असे शेतकरी आपल्या शेतातील पिके वाचविण्याची धडपड करीत आहे.
त्यांनी तुषार सिंचन चालू करून पिके वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुळातच ओलिताची सोय खूप कमी शेतकऱ्यांकडे आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय असेल तो शेतकरीसुद्धा मोठ्या कालावधीसाठी शेती क्षेत्र ओलिताखाली ठेवू शकत नाही.वीज आणि पाणीटंचाई या दोन्ही गोष्टींचा सामना त्यांना करावा लागतो. अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. आता यावर पावसाची तीव्र गरज आहे. ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे, ते शेतकरीसुद्धा फार क्षेत्र ओलित करू शकत नाही.
त्यांच्या समोरही विविध अडचणी आहेत. येत्या एक-दोन दिवसांत पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. सध्या शेतकरी पीक वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत परंतु, शेवटी पावसाने ओढ दिली, तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याचे चिन्ह आहे.
शेतकरी झाले चिंतातूर
शेतकऱ्यांनी कृषी केंद्राच्या दुकानातून बियाणे,रासायनिक खते नेऊन पेरणी केली. मात्र, पावसाने दडी मारल्याने त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. पीक कापूस,तूर लागवड व सोयाबीन पेरणीची घाई करीत सुरुवात केली असली तरी आद्रा नक्षत्राने बळीराजाच्या डोळ्यात पाणीही आणले आहेत. सध्या शेतकरी ८ ते १० दिवसांपासून पावसाची चातकासारखी वाट बघत आहे.